Maharashtra Political News Jalgoan BJP Row | Sarkarnama

पक्षाच्या खासदाराविरुद्ध भाजप जिल्हाध्यक्षाचा शड्डू?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पक्षाचे विद्यमान खासदार भाजपचे असतानाही जळगाव येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्येच जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारीवरून कलगीतुरा रंगण्याची शक्‍यता आहे.

जळगाव : पक्षाचे विद्यमान खासदार भाजपचे असतानाही जळगाव येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्येच जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारीवरून कलगीतुरा रंगण्याची शक्‍यता आहे.

जळगाव जिल्हयात लोकसभेच्या दोन जागा आहेत. एरंडोल मतदार संघात भाजपचे एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार आहेत. तर जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपचे ए. टी. पाटील हे खासदार आहेत. विशेष म्हणजे पाटील हे दुसऱ्यांदा याच मतदार संघात निवडून आले आहेत. मात्र, तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी खासदार पाटील यांची तयारी सुरू असतांनाच पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी याच जळगाव लोकसभा मतदार संघातून खासदारकीच्या उमेदवारीसाठी घोषणा केली आहे.

वाघ हे याच लोकसभा मतदार संघातील अमळनेर तालुक्‍यातील रहिवासी आहेत. येथील डांगरी प्र.चा. जिल्हा परिषद निवडणुकीत ते जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवडून गेले आहेत. त्यांच्या पत्नी स्मिता वाघ याच मतदार संघातून जिल्हा परिषद सदस्या होत्य. त्यानंतर त्या जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या. आता त्या विधानपरिषदच्या आमदार आहेत. पक्षाचे अध्यक्ष इतरांना उमेदवारी देत असतात. परंतु, पक्षाचे अध्यक्ष उदय वाघ आपली उमेदवारी जाहीर केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष याच मतदार संघात भाजपचे ए. टी. पाटील खासदार आहेत. त्यामुळे आगामी काळात पाटील यांची उमेदवारी रद्द होण्याचे हे संकेत आहेत काय? असा प्रश्‍नही आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षात लोकसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदरच उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. खासदार पाटील यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, आगामी काळात जळगाव भाजपमध्ये उमेदवारीचा कलगीतुरा रंगणार हे निश्‍चित दिसत आहे.

संबंधित लेख