Maharashtra Political News Jalgaon Mayor | Sarkarnama

आईच्या पदाच्या खुर्चीवर मुले विराजमान जळगावच्या : महापौर, उपमहापौरांना अनोखे भाग्य

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

जळगाव महापालिकेत महापौर व उपमहापौरपदावर नवीन नियुक्‍त्या झालेल्या आहेत. महापौरपदी ललीत कोल्हे व उपमहापौरपदी गणेश बुधो सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोघांच्या निवडीतील एक साम्य म्हणजे दोघांच्या मातोश्री याच पालिकेत त्याच खुर्चीवर विराजमान होत्या

जळगाव : ज्या पदाच्या खुर्चीवर पूर्वी आपल्या मातुःश्री  बसल्या होत्या त्याच पदाच्या खुर्चीवर मुलांना बसण्याचे भाग्य जळगाव महापालिकेत पदाधिकाऱ्यांना लाभले आहे. महापालिकेचे महापौर ललीत कोल्हे यांच्या मातोश्री सिंधू कोल्हे नगराध्यक्ष होत्या, तर नुकतेच उपमहापौर झालेले गणेश सोनवणे यांच्या मातोश्री (कै.) भागीरथी सोनवणे यासुध्दा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी सुरेशदादा जैन यांचेच नेतृत्व होते आजही त्यांचेच नेतृत्व आहे.

जळगाव महापालिकेत महापौर व उपमहापौरपदावर नवीन नियुक्‍त्या झालेल्या आहेत. महापौरपदी ललीत कोल्हे व उपमहापौरपदी गणेश बुधो सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोघांच्या निवडीतील एक साम्य म्हणजे दोघांच्या मातोश्री याच पालिकेत त्याच खुर्चीवर विराजमान होत्या, महापौर ललीत कोल्हे यांच्या मातोश्री सिंधूताई कोल्हे या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या. 20 नोव्हेंबर 1998 ते 10 मे 99 या कालावधीत त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. तर उपमहापौरपदी बिनविरोध निवड झालेले गणेश सोनवणे यांच्या मातोश्री (कै.) श्रीमती भागीरथीबाई बुधो सोनवणे महापालिकेत उपनगराध्यक्ष होत्या, त्यांनी 27 जून 2001 ते 23 डिसेंबर 2001 या कालावधीत उपनगराध्यक्ष म्हणून याच सतरा मजलीच्या इमारतीच्या सतरा मजल्यावर दालनांत कारभार पाहिला आहे.

विशेष म्हणजे त्यावेळीही सुरेशदादा जैन यांचेच नेतृत्व होते. त्यावेळी शहर विकास आघाडी होती आज खानदेश विकास आघाडी आहे. एवढाच काय तो फरक आहे.

संबंधित लेख