Maharashtra Political News Eknath Khadse Journalists | Sarkarnama

पत्रकार माझ्या वाईटावर आहेत : एकनाथ खडसे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधातील याचिकाकर्त्या अंजली दमानिया प्रकरणात 'एलसीबी'ने काय कारवाई केली याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळेच आज खडसेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीस बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण तापवण्यात माध्यमांचा हात असल्याचा खडसे यांचा समज आहे. त्यामुळे आज चौकशीनंतर गाडीत बसतांना त्यांनी 'पत्रकार वाईटावर आहेत' अशी खंत व्यक्त केली.

नाशिक : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधातील याचिकाकर्त्या अंजली दमानिया प्रकरणात 'एलसीबी'ने काय कारवाई केली याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळेच आज खडसेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीस बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रकरण तापवण्यात माध्यमांचा हात असल्याचा खडसे यांचा समज आहे. त्यामुळे आज चौकशीनंतर गाडीत बसतांना त्यांनी 'पत्रकार वाईटावर आहेत' अशी खंत व्यक्त केली.

विविध प्रकरणांचा ससेमीरा चुकविण्याच्या प्रयत्नात एकनाथ खडसे प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यातून सुटका होण्याऐवजी ते गुंतत चालल्याचे चित्र आहे. त्यातून जळगाव येथील मेळाव्यात त्यांनी अंजली दमानीया यांच्या विषयी वक्तव्य केले होते. ही बाब दमानीया यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणुन देत कारवाईची मागणी केली होती. त्यासंदर्भात सरकार तसेच खडसे यांच्या वकिलांनी मात्र बचावात्मक भूमिका घेतली होती.

मात्र, यासंदर्भात दोन आठवड्यात अहवाल द्यायचा असल्याने आज खडसेंना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यात कोणतेही नवे प्रकरण नाही. त्यामुळेच गोपनियता पाळण्याच्या सूचना थेट वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्याचे कळते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक अधिक्षकांनी 'नो कॉमेटस्‌' म्हणत माध्यमांना टाळले. तर कार्यालयातून बाहेर पडतांना वारंवार विचारणा करुनही वाहिन्यांचे बूम बाजुला सारत खडसे यांनीही मौन पाळले. मात्र वाहनात बसता बसता 'काढा काढा चांगले फोटो काढा. तुम्ही असेही वाईटावरच आहात' असे स्वगत म्हटले. ते बरेच काही सांगून गेले.

माजी मंत्री खडसे चौकशीला आले तोपर्यंत याबाबत कोणालाही फारशी माहिती नव्हती. मात्र, चर्चा सुरु झाल्यावर भाजपचे खासदार, विविध आमदारांनीही माध्यमांच्या प्रतिनिधींकडे याबाबत विचारणा केली. या प्रकरणाला पक्षांतर्गत राजकीय कंगोरे असल्याने कोणीही थेट 'एसीबी' कार्यालयाकडे अथवा खडसेंच्या समर्थकांकडे विचारणा करण्याचे कटाक्षाने टाळले. खडसेंच्या समर्थक मानल्या जाणाऱ्या एक आमदार शहरात आहेत. मात्र त्यांनीही खडसेंची भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे खडसेंची ही चौकशी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

संबंधित लेख