Maharashtra Political News CM Nana Patole | Sarkarnama

पटोलेंनी मच्छिमारांची लढाई जिंकली

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

काही दिवसांपूर्वी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने वादळ उठले होते. मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या आमदार-खासदारांच्या बैठकीलाही नाना पटोले यांनी हजेरी लावली नव्हती. यामुळे  काल झालेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. या बैठकीत राजकारणावर चर्चा झाली नसून मच्छिमारांच्या समस्यांवर चर्चा झाली आहे.

नागपूर : खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मच्छिमारांच्या समस्या मांडल्या. यात गेल्या जून महिन्यात जारी झालेला शासन निर्णय (जीआर) मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यामुळे खासदार पटोले यांनी मच्छिमारांची लढाई जिंकल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याने वादळ उठले होते. मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या आमदार-खासदारांच्या बैठकीलाही नाना पटोले यांनी हजेरी लावली नव्हती. यामुळे काल झालेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. या बैठकीत राजकारणावर चर्चा झाली नसून मच्छिमारांच्या समस्यांवर चर्चा झाली आहे.

गेल्या जून महिन्यात पशु व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी मच्छिमारांसाठी तलावांचे लिलाव करण्याचे नवे धोरण आखले होते. यात परंपरागत मच्छिमारी संस्थांवर अन्याय झाला होता. यात तलावांचा ठेका घेण्यासाठी किमान 15 लाख रुपयांची रक्कम सरकार जमा करण्याची तरतूद केली होती. एवढी मोठी रक्कम जमा करणे मच्छिमारी संस्थांना शक्‍य नव्हते.

या धोरणाचा खासदार पटोले यांनी विरोध केला होता. यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्हा परिषदांकडे असलेल्या तलावांना हे धोरण लागू होणार नसल्याचे आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून यासंदर्भात नवे धोरण आखण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. यामुळे खासदार पटोले यांच्या शिष्टाईला यश आल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख