Maharashtra Political News Buldhana Shivsena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

बुलढाण्याच्या शिवसेनेतील एकेकाळचे 'राजे' आज मात्र अडगळीत

अरूण जैन
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

शिवसैनिक.....शाखाप्रमुख.....जिल्हाप्रमुख....तिनवेळा आमदार...विधानसभा तालिकाध्यक्ष...अशा विविध पदांवर काम केलेले माजी आमदार विजयराज शिंदे अर्थात 'राजे' आज मात्र अडगळीत पडले आहेत. ते स्वतःहून मागे पडले की कुणी त्यांना पाडले, हा संशोधनाचा विषय बनला आहे. पक्षातंर्गत कुरघोडीचे राजकारण आणि स्वकियांनीच सोडलेली साथ यामुळे कधी काळी सिंह गर्जना करणारे 'राजे' आज अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

बुलडाणा : शिवसैनिक...शाखाप्रमुख...जिल्हाप्रमुख...तिनदा आमदार...विधानसभा तालिकाध्यक्ष...अशा विविध पदांवर काम केलेले माजी आमदार विजयराज शिंदे अर्थात 'राजे' आज मात्र अडगळीत पडले आहेत. ते स्वतःहून मागे पडले की कुणी त्यांना पाडले, हा संशोधनाचा विषय बनला आहे. पक्षातंर्गत कुरघोडीचे राजकारण आणि स्वकियांनीच सोडलेली साथ यामुळे कधी काळी सिंह गर्जना करणारे 'राजे' आज अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

आपल्या काही निवडक हितचिंतकांचे 'राजे' असलेले विजयराज जेव्हापासून विधानसभेच्या गडावरून पडले (नव्हे कोसळले) तेव्हापासूनच ते पक्षाला नकोसे झाले असल्याचे जाणवते. खासदार तथा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव व विजयराज शिंदे हे समीकरण जुळल्याचे सेनेत कधी दिसले नाही. उलट एकेकाळी शिंदे यांचे समर्थक असलेले पण आज खासदारांचे विश्वासू असलेले जालिंदर बुधवत जिल्हाप्रमुख आहेत. एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले संजय गायकवाड मनसेतून सेनेत येऊन थेट उपजिल्हाप्रमुख झालेत. शिंदे पराभूत झाल्याने अनेक मावळेदेखील शिवालयापासून तुटून संपर्क कार्यालयात दाखल झाले.

आता प्रश्न असा येतो की 'राजे' अडगळीत पडले की पाडले? हा प्रश्न पडण्याचे कारण असे की परवा शिवसेनेने कर्जमाफीचे लाभ दसरापूर्वी द्या म्हणून आंदोलन केले. बुलडाण्यात आंदोलन आणि शिंदेंची अनुपस्थिती याबाबत त्यांचे म्हणणे जाणून घेतले तर कळले की हे तर काहीच नाही. 'पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दौरा असो की दिवाकर रावतेंचा, आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. साधे निमंत्रणही नसते', असे ते सांगतात.

मात्र, महाविद्यालयीन जिवनापासून शिवसैनिक असल्याने शांत बसतील ते विजयराज कसले. ते अधूनमधून 'एकला चलो रे' च्या भूमिकेतून मंत्र्यांना भेटतात. निवेदने देतात. मुख्यमंत्र्यांना भेटतात. गडकरींना भेटतात; रस्त्यांच्या समस्या मांडतात. कर्जमाफीसाठी बुलडाणा सोडून पाडळीत ढोल वाजवतात. आपले राजकीय अस्तित्व दाखवायचे प्रयत्न चालू ठेवतात. पण आपल्याला अडगळीत टाकल्याची भावनाही प्रगटही करतात. राजेंनी स्वतः सेनेच्या गडावर आपला तंबू कायम ठेवला पाहिजेत की 'बोलावणे आल्याशिवाय नाही' ही भूमिका कायम ठेवली पाहिजे, या विवंचनेत त्यांचे समर्थक पडले आहेत.

संबंधित लेख