लिंगायत व मराठा मोर्चा काँग्रेस पुरस्कृत : खासदार अंगडींची जीभ घसरली

गुजरातला पटेल, राजस्थानला गुज्जर, हरियानात जाट समाजाचे आंदोलन झाले. तसेच महाराष्ट्रात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या साऱ्या आंदोलनामागे काँग्रेस आहे. 'फोडा व राज्य करा', हे धोरण काँग्रेसचे आहे. तसाच प्रयत्न लिंगायत समाजबाबत सुरू आहे - सुरेश अंगडी
लिंगायत व मराठा मोर्चा काँग्रेस पुरस्कृत : खासदार अंगडींची जीभ घसरली

बेळगाव : भाजपचे बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांची पुन्हा जीभ घसरली असून महाराष्ट्र व बेळगावात झालेला सकल मराठा क्रांती मोर्चा काँग्रेस पुरस्कृत होता, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

खासदार अंगडी यांनी आज (ता 26) पत्रकार परिषद आयोजित केली होती. लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून घोषित केला जावा, या मागणीसाठी आयोजित मोर्चा काँग्रेस पुरस्कृत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.  आपण त्या वक्त्याव्यावर ठाम असल्याचे सांगून मोर्चा काँग्रेस पुरस्कृत होता, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

गुजरातला पटेल, राजस्थानला गुज्जर, हरियानात जाट समाजाचे आंदोलन झाले. तसेच महाराष्ट्रात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या साऱ्या आंदोलनामागे काँग्रेस आहे. 'फोडा व राज्य करा', हे धोरण काँग्रेसचे आहे. तसाच प्रयत्न लिंगायत समाजबाबत सुरू आहे,  असे वक्तव्य अंगडी यांनी केले.

लिंगायत समाजाच्या आंदोलनाशी मराठा समाजाच्या आंदोलनाशी तुलना करण्याची गरज नव्हती. पण, केवळ मराठी भाषकांना डिवचण्यासाठी अंगडी यांनी वक्तव्य केल्याचे मानले जाते. कोणत्याही पक्षाचे पाठबळ नाही, व्यासपीठ नाही वा कोणी नेता नाही, निव्वळ आम मराठा आणि बेळगावात मराठा आणि मराठी भाषकांच्या पाठबळावर यशस्वी ठरलेल्या लढ्याला राजकीय रंग अंगडी यांनी देण्याचा प्रयत्न केल्यामुळे मराठी भाषकांत संताप व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com