शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवर आता विमान उड्डाण प्रशिक्षण

मुंबई: महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने शिर्डी,धुळे,अमरावती व कराड या विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली. शिर्डी विमानतळावर लवकरच रात्री विमान उतरवण्याची सुविधा उपलध होणार आहे .
pilot-training
pilot-training

मुंबई  : महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली. शिर्डी विमानतळावर लवकरच रात्री विमान उतरवण्याची सुविधा उपलध होणार आहे . 

राज्यात अनेक ठिकाणी विमानतळ कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रशिक्षण संस्थांसाठी विचारणा होत आहे. शिर्डी, धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवरील पायाभूत सुविधांचा वापर या प्रशिक्षण संस्थांना देण्यासंदर्भात संचालक मंडळाने यावेळी मान्यता दिली. या संस्था खासगी सार्वजनिक सहभाग तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत.

पुरंदर, अमरावती, कराड, सोलापूर, धुळे, फलटण येथील विमानतळ प्रकल्पांच्या विविध कामांनाही मान्यता देण्यात आली.

शिर्डी येथील विमानतळ कार्यान्वित झाले आहे. या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्याचे काम प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले असून आवश्यक परवाने मिळाल्यानंतर लवकरच रात्रीच्या वेळीही विमान उतरण्यास सुरुवात होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

मिहान प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना कंपन्यांमार्फत प्रशिक्षण देऊन  नोकरीमध्ये सामावून घेण्याच्या प्रस्तावाला यावेळी मान्यता देण्यात आली.

प्रकल्पग्रस्तांना कंपन्यांमध्ये त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार कंपन्यांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी येणार खर्च हा प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाईल, असे यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

चंद्रपूर येथील विमानतळाच्या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्याच्या प्रस्तावास  मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 63 वी बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, 

नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद राज, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी आदी यावेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com