जॉर्डन रिव्हजनी फोडला घाम

विठ्ठलाच्या पंढरी नगरीला 'हायटेक स्पिरिच्युअल' बनविण्यासाठी कॅनडा सरकारच्या मदतीने राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. याचा एक भाग म्हणून या विषयी प्राथमिक चर्चा करण्यासाठी व विठ्ठल मंदिराची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता.3) कॅनडाचे कौन्सिलर जनरल जॉर्डन रिव्हज यांनी भर दुपारी उन्हात पायी फिरुन न थकता चंद्रभागा नदी, मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत उन्हात पायी फिरणाऱ्या नेते व अधिकाऱ्यांना मात्र चांगलाच घाम फुटला.
जॉर्डन रिव्हजनी फोडला घाम

पंढरपूर : विठ्ठलाच्या पंढरी नगरीला 'हायटेक स्पिरिच्युअल' बनविण्यासाठी कॅनडा सरकारच्या मदतीने राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. याचा एक भाग म्हणून या विषयी प्राथमिक चर्चा करण्यासाठी व विठ्ठल मंदिराची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता.3) कॅनडाचे कौन्सिलर जनरल जॉर्डन रिव्हज यांनी भर दुपारी उन्हात पायी फिरुन न थकता चंद्रभागा नदी, मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत उन्हात पायी फिरणाऱ्या नेते व अधिकाऱ्यांना मात्र चांगलाच घाम फुटला.

दरम्यान जॉर्डन रिव्हज यांनी कुठेही न थांबता, न थकता तब्बल दोन तासाहून अधिक वेळ व्यवस्थित पाहणी करून पंढरपूर तीर्थक्षेत्रा विषयी माहिती जाणून घेतली. भर दुपारच्या उन्हातील त्यांचा हा उत्साह पाहून अनेकांना अर्श्‍चयाचा धक्का बसला. तर त्यांच्या सोबत फिरताना इतरांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता कॅनेडियन कौन्सिलर जॉर्डन व त्यांच्या सहकारी अँजेला शूवाटर तारा यांचे पंढरीत हॅलीकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर सर्वजण मंदिरात आले. विठ्ठल दर्शन आणि मंदिराची पाहणी केल्यानंतर थेट जॉर्डन पायी चालत नामदेव पायरी जवळ आले. तेथे त्यांनी नामदेव समाधीची माहिती घेतली. पुढे महाद्वारातून चालत थेट महाद्वार घाटावर पोचले. यावेळी दुपारचा एक वाजला होता. उन्हाचा पारा चांगलाच वाढला होता.

यावेळी त्यांच्या सोबत पायी फिरणारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी सर्वचजण घामाने डबाबल्याने त्रस्त झाले होते. परंतु, अशा उन्हात देखील जॉर्डन यांच्या चेहऱ्यावर जराही थकवा आल्याचे जाणवत नव्हते. नदी आणि घाटाची पाहणी करून झाल्यानंतर ते चालत पुन्हा तुकाराम भवनामध्ये आले. तेथील कार्यक्रमानंतर ते विश्राम गृहावर पोचले. पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्‍नांना त्यांनी चोख उत्तरे दिली. दिवसभराच्या धावपळीमध्ये नेते, अधिकारी आणि पत्रकारांची चांगलीच धावपळ झाल्याने सर्वजण थकले होते.

परंतु, जॉर्डन रिव्हज यांच्या चेहऱ्यावरून किंवा त्यांच्या देहबोलीवरुन ते जराही थकल्याचेही दिसत नव्हेत. ते परत गेल्यानंतर मात्र 'जॉर्डन रिव्हज यांनी चांगलाच घाम फोडला', असे मिश्‍कीलपणे अनेकांच्या तोंडून उद्‌गार निघाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com