Maharashtra needs Narayan Rane - Nitesh Rane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

नारायण राणेंची महाराष्ट्राला गरज : नितेश राणे

सरकारनामा न्यूज ब्युरो
शनिवार, 3 मार्च 2018

नारायण राणे यांनी राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याऐवजी त्यांनामहाराष्ट्राच्या विधीमंडळातच आम्हाला पाहायचे आहे. राणे यांना राज्यसभेचीऑफर असली तरी ती त्यांनी स्विकारायला नको.

-आमदार नितेश राणे

मुंबई : नारायण राणे यांनी राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याऐवजी त्यांनामहाराष्ट्राच्या विधीमंडळातच आम्हाला पाहायचे आहे. राणे यांना राज्यसभेचीऑफर असली तरी ती त्यांनी स्विकारायला नको अशा आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे आमदार नितेश राणे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

राणे यांना राज्यसभेची ऑफर असल्याबद्दल राज्यभरातून कार्यकर्त्यांचे
मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत. अनेक कार्यकर्ते राणे साहेबांना
भेटण्यासाठी येत आहेत. राणे साहेबांची महाराष्ट्राला गरज आहे.
स्वार्थापेक्षा महाराष्ट्राचे हित महत्वाचे आहे. त्यामुळे नारायण राणे
यांनी महाराष्ट्रातच राहावे, अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांकडून
व्यक्त केल्या जात असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले.

संबंधित लेख