maharashtra legislative assembly session | Sarkarnama

विरोधकांसाठी आमच्या हृदयात आजही जागा : मुनगंटीवार 

ब्रह्मा चट्टे 
शनिवार, 20 मे 2017

विरोधकांनी विरोध न करता देशातील इतर राज्यप्रमाणे जीएसटी बील बिनविरोध मंजूर करावे. आम्ही विरोधकांचा आदर करणारे लोक आहोत. आमच्या हृदयात विरोधकांना जागा आहे. ज्यांना यायचे असेल, ते आमच्याकडे येऊ शकतात, असे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना चुचकारले. ते जीएसटी विधयेकाच्या मंजुरीसाठी बोलवण्यात आलेल्या विशेष आधिवेशनावेळी विधानसभेत बोलत होते. 

मुंबई : विरोधकांनी विरोध न करता देशातील इतर राज्यप्रमाणे जीएसटी बील बिनविरोध मंजूर करावे. आम्ही विरोधकांचा आदर करणारे लोक आहोत. आमच्या हृदयात विरोधकांना जागा आहे. ज्यांना यायचे असेल, ते आमच्याकडे येऊ शकतात, असे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना चुचकारले. ते जीएसटी विधयेकाच्या मंजुरीसाठी बोलवण्यात आलेल्या विशेष आधिवेशनावेळी विधानसभेत बोलत होते. 

विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होताच शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा काही विरोधी सदस्यांनी दिल्या. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुंनगटीवार यांनी वस्तू व सेवा करार विधेयक सभागृहात मांडले. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी जीएसटीची पार्श्वभूमी सभागृहासमोर मांडायला हवी, असा आग्रह धरला. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री बोलत आहेत, पार्श्‍वभूमी सांगतील असे नमूद केले. त्यावर नाराज होत बिल संपले आणि आता काय मांडणार असे सांगत अजित पवार जागेवर बसले. 

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. विधेयक मांडण्याअगोदर अर्थमंत्र्यांनी या बिलाबाबत समजावून सांगावे म्हणजे या बिलावर बोलताना सदस्य हवेत बार करणार नाहीत. मातोश्रीला काय घडले, दिल्लीला काय घडले हे सांगावे, अशी मागणी करत वळसे पाटील अर्थमंत्र्यांना चिमटे काढले. 

यानंतर अर्थमंत्र्यांनी बिलाबाबत स्पष्टीकरण दिले. या वेळी अर्थमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर आक्षेप घेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिल वेबसाइटवर का टाकले नाही असा प्रश्न केला. त्यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी हे बिल बहुमताने नाही तर सहमतीने मंजूर झाले आहे. या बिलावर विरोधकांनी विरोध न करता देशातील इतर राज्यांप्रमाणे जीएसटी बिल बिनविरोध मंजूर करावे. आम्ही विरोधकांचा आदर करणारे लोक आहोत. आमच्या हृदयात विरोधकांना जागा आहे. ज्यांना यायचे असेल ते आमच्याकडे येऊ शकतात असे सांगत असे सांगत अर्थमंत्र्यांनी विरोधकांना चुचकारले. यावर सभागृहात विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांमध्ये एकच हशा पिकली. 

संबंधित लेख