Maharashtra Kesari Vijay Chaudhari Devendra Fadnavis Dhananjay Munde | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे नवी दिल्लीत निधन

महाराष्ट्र केसरी विजय चौधरीच्या नोकरीसाठी विरोधक एकवटणार 

ब्रह्मदेव चट्टे
शनिवार, 4 मार्च 2017

दर बुधवारी मी मंत्रीमंडळाच्या बैठकीला जातो. मला टेबलावर फाईल आहे, समितीकडे दिलीयं, काम सुरूयं अशी उत्तरे मिळतात. सरकारकडून कसलीही दखल घेतली जात नाही. तीन महिन्यापुर्वी फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही बाकी राहिली असल्याचे सांगण्यात आले आहे. 
- नथू चौधरी ( विजय चौधरीचे वडिल )

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या सभाग्रहामध्ये एकाद्या विषयासंबधी अश्वासन देणे व त्याची पुर्ताता न करणे हे सभाग्रहाचा अवमान आहे. विजय चौधरी पहिल्या वेळेस महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मी नोकरी मागणी केली होती. याबाबत अधिवेशनापुर्वी निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचे विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

विजय चौधरीच्या नोकरी संदर्भात मित्र पक्षाला सोबत घेणार असल्याचे सांगत मुंडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अश्वासन देवून 75 दिवस झाले आहेत. तरीही तांत्रिक पुर्तता करत आहेत असे मुख्यमंत्री सांगतात. यावरून राज्याच्या कारभाराची गती समजते असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावाला. 

मुख्यमंत्री केले नोकरीसंदर्भात ट्‌विट्ट
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना सात दिवसात शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून 75 दिवस उलटून गेले आहे. आता मुख्यमंत्र्यांना जाग आली असून ट्‌विट्टरवरून विजयच्या नोकरी संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्या ट्‌विट्टमध्ये मुख्यमंत्री म्हणतात, ' राज्य सरकार खेळाडूना नोकरी देण्यासाठी काम करत आहे, ज्यात विजय चौधरीचीही समावेश आहे. आम्ही काही तांत्रिक बाबींची पुर्तता करत आहोत. 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचा विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी ठरला आहे. विजय चौधरीेने अभिजित कटकेवर मात करुन सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत विजय चौधरींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी विजयला सात दिवसात शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती. विजयला शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे, त्यामुळे कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींना नोकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. 

 

संबंधित लेख