Maharashtra Infuential Leader Eknath Khadse in Sarkarnama Diwali Ank Interview | Sarkarnama

युती तोडण्याची पक्षाची भूमिकाच आपण जाहिर केली होती : एकनाथ खडसे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

जळगाव सकाळचे खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व भाजपचा ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी सरकारनामा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून थेट संवाद साधला. यावेळी खडसे यांनी राजकारणापासून समाजकारणापर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट आणि मनमोकळी मते व्यक्त केली.  

जळगाव : 2014 च्या निवडणुकीत युती तोडण्याबाबतची भूमिका आपली नव्हती तर पक्षाचीच होती, तीच आपण जाहिर केली आणि ती फायद्याची ठरली. त्यामुळे भाजपची सत्ता राज्यात आली, असे मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी 'सरकारनामा फेसबुक लाइव्ह' द्वारे संवाद साधताना व्यक्त केले. 

जळगाव सकाळचे खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. यावेळी खडसे यांनी राजकारणापासून समाजकारणापर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट आणि मनमोकळी मते व्यक्त केली.  

त्यांच्या मुलाखतीचा गोषवारा असा
प्रश्‍न : सन 2014 च्या निवडणूकीतील यशाबद्दल काय सांगाल? 
उत्तर : सन 2014 ची निवडणूक अत्यंत पक्षासाठी अत्यंत महत्वाची होती. काँग्रेस आघाडी सरकारची पंधरा वर्षापासून राज्यात सत्ता होती. या सरकाराच्या कामगिरीच्या विरोधात आम्ही आवाज उठविला हे सरकार आता नकोच अशीच व्युव्हरचना आम्ही केली. गोपीनाथ मुंढे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह कार्यकत्यानी रक्ताचे पाणी करून आघाडी सरकारविरूध्द आवाज उठवून हे सरकार आणले आहे. त्या कालखंडात आपण अनेक नवीन लोकांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे पक्षाच्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या.
 
प्रश्‍न : शिवसेनेसोबत युती तोडण्याबाबत तेंव्हांच्या आणि आताच्या भूमिकेबाबत काय सांगाल? 
उत्तर : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे राज्यातही आपले सरकार येईल याची खात्री निर्माण झाली होती. त्यामुळे पक्षातील अनेकांना युती तोडून स्वंतत्र लढावे असे वाटत होते.त्यांनर पक्षानेही युती तोडण्याचीच भूमिका घेतली. पक्षाचा हा निर्णय आपण बाहेर जाहिर केला.मात्र हा निर्णय फायदेशीर ठरला त्यामुळे पक्षाला राज्यात 123 जागा मिळाल्या. मात्र हा निर्णय उशीरा घेण्यात आला जर लवकर निर्णय घेतला असता तर तब्बल 150 जागा मिळाल्या असत्या. आज पक्षाचे पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची युती करण्याची भूमिका घेतली आहे, ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे आज जर पक्षाची युतीची भूमिका असेल तरी पक्षाशी सुसंगत आहे. आपणही युतीबाबत पक्षाशी सुसंगत भूमिकाच जाहिर केली असती. 

मुलाखतीचा पुढचा भाग - पुढील बातमीत 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा #SarkarnamaDiwali

महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा - सरकारनामा दिवाळी अंक - आजच अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात मागणी नोंदवा

संबंधित लेख