Maharashtra Influential Youth leader Jitendra Awhad in Sarkarnama Facebook live | Sarkarnama

बेधडक जितेंद्र आव्हाड उद्या सरकारनामा फेसबूक लाईव्हमध्ये

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

डाॅ. जितेंद्र आव्हाड सरकारनामा फेसबूक लाईव्ह

रविवार दि. 4 नोव्हेंबर, 2018
वेळ दुपारी 12 वाजता

मुंबई : बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, हा दिवस अत्यंत वेदनादायी....भिडे गुरुजी असे कसे हो तुमचे शिष्य....ये अंदर की बात है..,राज ठाकरे हमारे साथ है..अशी बेधडक वक्तव्ये करणारे राष्ट्रवादीचे धडाडीचे नेते, आग्रही भूमिका मांडणारे, आक्रमक व रोखठोख अशी ओळख असणारे, शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे नेणारे #युवानेतृत्व डाॅ. जितेंद्र आव्हाड 'सरकारनामा' फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून वाचकांना भेटायला येत आहेत. उद्या दुपारी 12 वाजता आव्हाड लोकांशी संवाद साधणार आहेत. 

सरकारनामाच्या दिवाळी अंकात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. त्याच निमित्ताने आव्हाड उद्या दुपारी आपल्या चाहत्यांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत आक्रमक नेते. काही वक्तव्यांनी त्यांनी वादही ओढवून घेतला. मात्र, स्पष्टपणे बोलणारे अशी त्यांची ख्याती आहे. उद्याच्या फेसबूक लाईव्हमध्येही आव्हाड याच स्पष्टपणे बोलतील अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा #SarkarnamaDiwali

डाॅ. जितेंद्र आव्हाड सरकारनामा फेसबूक लाईव्ह

रविवार दि. 4 नोव्हेंबर, 2018
वेळ दुपारी 12 वाजता

आजच 'सरकारनामाचा' दिवाळी अंक बुक करा अॅमेझॉनवर सवलतीच्या दरात...
अधिक माहितीसाठी -
व्हॉट्सअॅप : 91300 88459 
फोन : 9881598815
ईमेल : webeditor@esakal.com

संबंधित लेख