सरकार पाच वर्षे पूर्ण करेल : गजाजन किर्तीकर 

राज्यातील भाजपचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. त्याआधी शिवसेना त्यांचा पाठींबा काढून घेणार नाही, मात्र, त्यानंतर येणाऱ्या निवडणूकीत शिवसेना स्वबळावरच लढेल. भाजपने आतापर्यंत सेनेला दिलेली वागणूक पाहता त्यांच्याशी युती कदापी होणार नाही, अशी भूमिका सेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.
सरकार पाच वर्षे पूर्ण करेल : गजाजन किर्तीकर 

सांगली : राज्यातील भाजपचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. त्याआधी शिवसेना त्यांचा पाठींबा काढून घेणार नाही, मात्र, त्यानंतर येणाऱ्या निवडणूकीत शिवसेना स्वबळावरच लढेल. भाजपने आतापर्यंत सेनेला दिलेली वागणूक पाहता त्यांच्याशी युती कदापी होणार नाही, अशी भूमिका सेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. 

ते म्हणाले, "शिवेसना भाजपसोबत सांगलीच काय देशात कुठेच युती करणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत तशी स्पष्ट घोषणा केली आहे. अगदी भाजपचे अध्यक्ष अमित शहा भेटून गेल्यानंतरही आम्ही ती भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. लोकसभा, विधानसभा स्वतंत्रच लढू. भाजपने शिवसेनेचा सन्मान केला नाही. आम्ही युतीच्या शासनात गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद दिले होते. आता भाजपने शिवसेनेच्या ताकदीप्रमाणे स्थान दिले नाही. केंद्रात 21 जागा असताना दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद द्यायला हवे होते. 34 राष्ट्रीयकृत बॅंकांवर त्यांनी संचालक नेमले. त्यात सेनेला स्थान नाही. महामंडळावरील नियुक्‍त्या परस्पर केल्या जात आहेत. त्यांचे चालू द्या, आम्ही दीर्घ लढाईला तयार आहोत." 

शिवसेना फुटेल अशा चर्चांना अर्थ नाही. तसे काही होणार नाही. आम्ही काही धोरणात्मक निर्णय घेऊन भाजपला पाठींबा दिलाय, तो पाच वर्षांसाठी राहील. त्याआधी सरकार पडणार नाही, असे सांगूत ते म्हणाले, "महाराष्ट्रात शिवसेना भक्कम आहे. तळागाळात मूळे रुजली आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे लढून राज्यात सत्ता मिळवू, हाच आमचा निर्धार आहे.'' पंतप्रधान मोंदींबाबत बोलताना ते म्हणाले, "मोदी हटाव, हा आमचा नारा नाही.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com