maharashtra government | Sarkarnama

राज्य सरकारच्या केंद्राकडून तूर खरेदी जोमात

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई : तूर खरेदीने राज्य सरकारच्या तसेच शिल्लक राहिलेल्या तुरीच्या ढिगाऱ्याने शेतकऱ्यांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. एकीकडे विरोधी पक्षाने शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीवरून राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे, तर दुसरीकडे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याबाबत केलेला पाठपुरावा यामुळे राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या तुरीसाठी पुन्हा खरेदी केंद्र सुरू करावी लागली आहेत. 4 मेपर्यंत राज्य सरकारने ग्रामीण भागात 88 ठिकाणी तूर खरेदी केंद्र उघडली असून या केंद्रांना शेतकऱ्यांचा प्रतिसादही उत्स्फूर्तपणे लाभत आहे. 

राज्य सरकारने तूर खरेदीची 22 एप्रिल अंतिम तारीख जाहीर केली होती. तथापि यंदा तुरीचे अंदाज 1कोटी 11 लाख क्विंटल उत्पादन झाल्याने कृषी विभागाचा तूर खरेदीमध्ये गोंधळ उडाला होता. गेल्या वर्षी 40 लाख क्विंटलचे उत्पादन झाले होते. यंदा जवळपास तिपटीने उत्पादन वाढल्याने 22 एप्रिलपर्यंत अवघी 41 लाख 51 हजार क्विंटलच तूर खरेदी झाली होती आणि शेतकऱ्यांकडे शासकीय आकडेवारीनुसार अंदाजे 70 लाख किंवटल तूर तशीच शेतात पडून होती. तुरप्रकरणी विरोधकांनी सरकारची कोंडी केल्याने ग्रामीण भागात विशेषत: मराठवाडा व विदर्भ या भाजपाच्याच बालेकिल्ल्यात भाजपाची शेतकऱ्यांमध्ये प्रतिमा मलिन होऊ लागली. त्यामुळे विरोधकांना आणखी गदारोळ करण्याची संधी मिळू नये म्हणून राज्य सरकारने ठिकठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू केली आहेत. 

4 मे रोजी सांयकाळी उशिरापर्यंत राज्य सरकारने 88 ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू केली असून या खरेदी केंद्रांवर 1 लाख 873 हजार क्विंटल शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या 33 आणि आदिवासी विकास महामंडळाच्या 6 खरेदी केंद्राकडूनही तूर खरेदी करण्यात येत आहे. मे अखेरीपर्यंत तूर खरेदी सुरू ठेवण्याचा राज्य सरकारचा मानस असून मागणीनुसार अजून तूर खरेदी केंद्र वाढविण्याचा कार्यक्रमही राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे. 

संबंधित लेख