Maharashtra day should be celebrated like Diwali Festival :Gavade | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

महाराष्ट्रदिन दिवाळी उत्सवासारखी साजरी करा : अरविंद गावडे

सुचिता रहाटे : सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 मे 2017

मुंबई: महाराष्ट्र दिन व शिवजयंती हे दोन्ही सण दिवाळी असल्यासारखे साजरे व्हावेत असे मनसे उपाध्यक्ष अरविंद गावडे म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ७०% मराठी माणसांचे अस्तित्व राहिले असून आपला महाराष्ट्र हा अखंड महाराष्ट्रीयन राखण्यासाठी महाराष्ट्र दिन पाळला पाहिजे .

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येतो. 

यंदाही मुंबईतील फोर्ट येथे मनसे तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु कोर्टाने या विभागाला " सायलन्स झोन" म्हणून घोषित केल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारी देशभक्तीपर गीत, गाणी लावून मुक्तपणे साजरी करतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन साजरा व्हावा.

महाराष्ट्रात मराठी प्रांत हळूहळू कमी होत चालला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवानी एकत्र येऊन महाराष्ट्र दिन  पाळलाच पाहिजे. महाराष्ट्र दिन साजरे करून मराठी माणसातली एकी टिकवणे फार गरजेचे आहे. सायलन्स झोन पाटी काढून टाकून महाराष्ट्र  दिन साजरी करण्याची परवानगी कोर्टाने द्यावी अशी मागणी गावडे यांनी सरकारकडे केली आहे.

संबंधित लेख