सैनिकांचा पाठीराखा, दुष्काळातील जलदूत ठरले डॉ. तुषार शेवाळे 

राज्यातील आघाडीच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आज "सरकारनामा''शी फेसबुक लाईव्ह मध्ये 'सकाळ'च्या नाशिक आवृत्तीचेसंपादक श्रीमंत माने यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गेली एकोणतीस वर्षे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कामाचे पदर उलगडले. दुष्काळाची झळ सोसणाऱ्या कसमादेतील शेतकऱ्यांची शेती अन्‌ सैन्यात गेलेल्या जवानांविषयी कृतज्ञता म्हणुन त्यांनी केलेले अफाट काम त्यांनी नम्रपणे मांडले. या मुलाखतीतील काही प्रश्‍नोत्तरे ...
सैनिकांचा पाठीराखा, दुष्काळातील जलदूत ठरले डॉ. तुषार शेवाळे 

नाशिक : काँग्रेसचे नेते आणि राज्यातील आघाडीच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी वाचकांशी सरकारनामा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी गेली एकोणतीस वर्षे सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कामाचे पदर उलगडले. दुष्काळाची झळ सोसणाऱ्या कसमादेतील शेतकऱ्यांची शेती अन्‌ सैन्यात गेलेल्या जवानांविषयी कृतज्ञता म्हणुन त्यांनी केलेले अफाट काम त्यांनी नम्रपणे मांडले. 'सकाळ'च्या नाशिक आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी डाॅ. शेवाळे यांची मुलाखत घेतली.

त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे - 

- निवडणुकीची तयारी सुरु आहे. या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी एक नवे नेतृत्व उदयास येत आहे. त्याविषयी सांगा. 
शेवाळे : मी गेले 29 वर्षे मालेगाव शहरात वैद्यकीय सेवा करीत आहे. एस.एस. झाल्यावर नाशिक येथे वैद्यकीय सेवा सुरु केली. मात्र ओढा ग्रामीण भागाकडे होता. त्यामुळे मालेगावला गेलो. तेथे 29 वर्षे वैद्यकीय काम करीत आहे. त्यात समाधानी आहे. त्या माध्यमातून जनतेने खुप प्रेम दिले. त्यातच सामाजिक कामातुन वेगळेपण निर्माण केले. यामध्ये आवर्जुन सांगावेसे वाटते की, आजी, माजी सैनीकांना मदत करुन वेगळेपणा जोपासला. माझे भाऊ इंजिनिअर दर्शन शेवाळे यांच्या मदतीने पाणी प्रश्‍नावर काम केले. जलसंधारणाची मोठी कामे केली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. परिसर जलसमृध्द झाला. 

- कसमादे भागातील राजकारणात माजी मंत्री डॉ. डी. एस. आहेर यांच्यानंतरनतर आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्याविषयी काय सांगाल? 
शेवाळे : मी मराठा विद्या प्रसारक संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. संस्थेने प्रोत्साहन दिल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाला गेलो. त्यात संस्थेचे मोठे योगदान होते. संस्था म्हटल्यावर एक वेगळी उर्जा संचारते. माझे सामाजिक काम पाहून गेल्या निवडणुकीत मला मालेगाव तालुक्‍याचे संचालक व्हावे असा आग्रह झाला. ते काम पाहून यंदाच्या निवडणुकीत मला अध्यक्ष व्हा असा आग्रह झाला. खरे तर ही निवडणूक मोठी असते. मोठी यंत्रणा का करते. त्यात नैतिकताही लागते. हे पद जिल्ह्यात, सामाजिक क्षेत्रात आदराचे व मोठे आहे. मात्र सभासदांनी विश्‍वास दाखवल्याने अध्यक्ष झालो. 

- मविप्रची निवडणुक सोपी नव्हती. एकही निवडणुक न हरलेले माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना तुम्ही टक्कर दिली. राज्याचे लक्ष त्याकडे लागले होते. त्याविषयी काय सांगाल?
शेवाळे : माझे काम सर्वसामान्यात आहे. गेली अनेक वर्षे लोकांशी संपर्क आल्यावर त्यांनी जी जी कामे सांगतीली, प्रश्‍न सांगीतले तो सोडवले. त्यामुळे सामान्यांत हा माणुस प्रश्‍न सोडवतो असा विश्‍वास होता. त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. जनतेसमोरची ही मोठी लढाई होती. मात्र, मला सहकारी, वरिष्ठांनी महाभारताचे उदाहरण दिले. त्यामुळेच प्रतिस्पर्धी सोनवणे एकही निवडणूक हरले नव्हते. मात्र, त्यांच्या विषयीचा आदर ठेऊनच मी मतदारांना मतांचे आवाहन केले. 

- कसमादे परिसरात आपण माजी सैनिकांत खुप काम केले. अनेक माजी सैनिकांना वैद्यकीय व अन्य मदत केलीत. त्याची प्रेरणा कशी मिळाली? 
शेवाळे : याचे एक वेगळे कारण आहे. मी दोनदा एनडीएची परिक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही. बारावी झाल्यावर मला सैन्यात जायचे होते. मात्र डॉक्‍टर झाल्यावर पुन्हा तो विचार होताच. मात्र विचार केला सेवा तर एकच आहे. सैन्यात गणवेष घालून काम करावे लागेल. समाजात गणवेषाशिवाय काम करावे लागेल. त्यामुळे विचार केला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तशी माजी सैनिकांसाठी काम करावे. या कामाची प्रेरणा त्यातुन आली. 

- आजवर किती माजी- आजी सैनिकांना मदत केली हे सांगता येईल का? 
शेवाळे : मी प्रत्येक शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन सांत्वन करतो. शक्‍य असेल ती पाच, दहा वीस हजारांची आर्थिक मदत क्षमतेप्रमाणे करतो. त्यांच्या कुटुबीयांची वैद्यकीय सेवेची जबाबदारी घेतो. किमान चौदा ते पंधरा हजार सैनिकांना मदत केली असेल. 

- आपली जलदूत अशीही ओळख आहे. त्याबाबत काय सांगाल?. 
शेवाळे : मी एमबीबीएस शिक्षण घेतले. त्याला प्रवेश मिळाला त्याचे कारण होते मला प्रकल्पग्रस्त म्हणुन दोन जादा गुण होते. आमच्या शेतातून कालवा जातो. 1972 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा आमचे सबंध कुटुंब त्या कालव्याच्या कामावर मजुरी करीत होते. त्यातुन मिळालेल्या सुकडीवर आम्ही निर्वाह केला. या कालव्याचे रुंदीकरण व्हावे असा 1.28 कोटींचा प्रस्ताव होता. मात्र, सरकारकडुन निधी मिळत नव्हता. काम रखडले होते. त्यावर आम्ही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना एकत्र केले. त्यांनी तुम्ही डिझेल द्या. मी यंत्र आणतो असे सांगितले. मी ते यंत्र उपलब्ध केले व शेतकऱ्यांनी चार लाखांचे डिझेल दिले. त्यातुन वीस दिवसांत 17 किलोमीटर कालव्याचे रुंदीकरण झाले. त्या यंत्राचे भाडे पुढे वैद्यकीय व्यवसाय करत करत तीन वर्षे मी फेडले. पंचेचाळीस हजार हेक्‍टर शेती व साडे सात लाख घनफुट पाणी त्यातुन वाढले. पुढे भाऊ दर्शन इंजिनिअर झाला. त्याला ते यंत्र घ्यायला सांगितले. त्याने यंत्र घेतले व कंत्राटदार झाला. पुढे आणखी दोन यंत्रे घेतली. आजही आम्ही पाण्यासाठी जिथे जिथे शेतकऱ्यांना लागेल तिथे शतेकरी, नागरिकांना यंत्र देतो. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा #SarkarnamaDiwali

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com