Maharashtra blow to NCP in Sudhagadh | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

सुधागड तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत

अमित गवळे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

आजवर अन्य पक्षांनी केवळ जनतेला वचने दिली. मात्र प्रत्यक्षात वचनपुर्ती केली नाही. त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. राष्ट्रवादीच्या वसंत ओसवाल यांनी केवळ कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून गोंजारण्याचे काम केले. आज राष्ट्रवादीची अवस्था दयनीय झाली आहे. शिवसेना संपुर्ण जिल्ह्यात स्वबळावर लढत आहे. शिवसेनेला संपुर्ण रायगड भगवामय करायचा आहे. त्यादृष्टीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. पेणमध्ये लवकरच मोठा राजकीय भुकंप होणार आहे - प्रकाश देसाई

पाली : सुधागड तालुक्यातील माणगाव (बुद्रुक) ग्रामपंचायत हद्दीतील पावसाळावाडी, उंबरवाडी, वासुंडे या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गुरुवारी  पालीतील शिवसेना जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला.

हा विभाग राष्ट्रवादी काँग्रसचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ धक्का बसला आहे. या वेळी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना प्रकाश देसाई म्हणाले, ''रायगड जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मकदृष्ट्या शक्ती वाढली आहे. इतर पक्षातील प्रमुख नेते व कार्यकर्ते शिवसेनेत सामिल होत आहेत. सुधागड तालुक्यात देखील शिवसेनेने उभारी घेतली आहे. आजवर केलेल्या विकासकामांच्या जोरावर आगामी निवडणुकांत अधिक ग्रामपंचायतीवर शिवसेना भगवा फडकवेल.'' भविष्यात मुरुड, अलिबाग, माणगाव,श्रीवर्धन,उरण या मतदारसंघातील आमदार शिवसेनेचे असतील असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत देखील शिवसेना आपला करिष्मा दाखवत चांगले यश संपादन करेल. भविष्यात विकास कामांबरोबरच बेरोजगारी, सर्वसामान्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे देसाई म्हणाले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांच्या समवेत सुनिल झुंजारराव, माजी सभापती पिठू डुमना, जीजाबा खेरटकर, नारायण दळवी, योगेश मोरे, बाळू शिंदे,कोंडू शिंदे, किशोर दळवी, हिरामन पालवे, शरद बोडके आदिंसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थीत होते.

 

संबंधित लेख