Maharashtra Bandh Stones pelted on Bjp Leaders vehicle in Nahsik | Sarkarnama

#MaharashtraBandh भाजप नेते माणिकराव कोकाटेंच्या गाडीवर दगडफेक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

येथील डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर सकाळी दहा पासून सकल मराठा समाजऱातर्फे शांततापूर्ण ठिय्या आंदोलन सुरू होते. त्यात युवकांचा एक गट सातत्याने आक्रमक होत होता. तसंयोजक त्याला वारंवार नियंत्रणात आणत होते मोठ्या प्रमाणावर घोषणा सुरू होत्या. अखेर हा गट नियंत्रणाबाहेर गेला.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरात ठीय्या आंदोलन सुरू होते. यावेळी नियंत्रणाबाहेर गेलेल्या युवकांच्या गटाने रास्ता रोको आंदोलन केले. भाजप नेते माणिकराव कोकाटे यांची गाडी जमावाने फोडली. त्यात त्यांनाही दगड लागला. 

येथील डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर सकाळी दहा पासून सकल मराठा समाजऱातर्फे शांततापूर्ण ठीय्या आंदोलन सुरू होते. त्यात युवकांचा एक गट सातत्याने आक्रमक होत होता. तसंयोजक त्याला वारंवार नियंत्रणात आणत होते मोठ्या प्रमाणावर घोषणा सुरू होत्या. अखेर हा गट नियंत्रणाबाहेर गेला. घोषणा देत त्यांनी दगडफेक केली. त्यात भाजप नेते, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे वाहन फोडण्यात आले. यावेळी कोकाटे यांनाही दगड लागला. 

त्यानंतर युवकांनी जुना गंगापुर नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. नंतर एक मोठा गट गंगापुर रस्त्याने अशोक स्तंभाकडे निघाला. या जमावाला केटीएचएम महाविद्यालयासमोर पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल स्वतः सामोरे जात जमावाची समजूत घालत होते. यावेळी समाजाचे नेते व संयोजक मंडपात शांततेत ठिय्या देऊन आंदोलन करीत होते.

संबंधित लेख