Maharashtra Bandh Protestors Burnt Tyres in Latur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

#MaharashtraBandh मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातूर बंद सुरु      

हरी तुगावकर / सुशांत सांगवे      
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी दुसर्‍या टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रांती दिनानिमित्त बंदची हाक देण्यात आली आहे.  शहरात सकाळ पासून आंदोलनकर्त्यांनी रस्ते जाम करून टाकले आहेत.

 लातूर : मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातूर बंदला सुरुवात झाली आहे. शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.  शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. टायर जाळत, घोषणा देत आंदोलकांनी शहरातील मुख्य रस्ते अडवले आहेत.            

मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी दुसर्‍या टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्रांती दिनानिमित्त बंदची हाक देण्यात आली आहे.  शहरात सकाळ पासून आंदोलनकर्त्यांनी रस्ते जाम करून टाकले आहेत. दरम्यान राज्यात काही ठिकाणी अनुचित प्रकार घडले आहेत. त्या मुळे सकाळ पासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित लेख