Maharashtra Bandh Nashik Clsoed in Half an hour by mob | Sarkarnama

#MaharahshtraBandh मराठा आरक्षण आंदोलनातील युवकांची शहरात घोषणांसह फेरी, अर्ध्या तासात नाशिक शहर बंद 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

आक्रमक युवकांचा हा जमाव गंगापुर रोड, अशोक स्तंभ, मेहेर सिग्नल, महात्मा गांधी रोड, मध्यवर्ती बसस्थानक, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, गडकरी चौक व अन्य भागात घोषणा देत फिरला. हातात झेंडे, आक्रमक घोषणा यांनी शहरात काही वेळातच तणाव निर्माण झाला. दुकाने बंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद केली.

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आंदोलकांवरील खटले मागे घ्यावेत यासाठी आज शहरात ठिय्या आंदोलन झाले. यामध्ये युवकांचा मोठा गट नियंत्रणाबाहेर गेला. त्यांनी नेत्यांच्या वाहनांवर दगड भिरकावले. रास्ता रोकोही केला. घोषणा देत हा जमाव शहरभर फिरला. त्यामुळे विविध अफवा पसरल्याने अर्ध्या तासातच शहर बंद झाले. या दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. 

डोंगरे वसतिगृह मैदानाच्या कोपऱ्यावर सकल मराठा समाजातर्फे सकाळी ठिय्या आंदोलन झाले. त्यात विविध सामाजिक तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. यामध्ये ज्येष्ठ नेते व्यासपीठावर होते. त्यात युवकांचा एक गट सातत्याने आक्रमक होत होता. दुपारी दीडला एक युवक भाषण करीत होता. त्यात या युवकाने राज्यातील सत्ताधारी युवकाने उत्साहात वादग्रस्त विधान केला. त्यावर काही नेत्यांनी कोणाचाही उल्लेख करु नये, संयम बाळगावा अशी सुचना केली. त्यावर या युवकाने प्रतिक्रीया दिल्याने गोंधळ झाला. वादावादी झाली. त्याचे रुपांतर बाचाबाचीत झाले. चार वाहनांची मोडतोड झाली. 

भाजपचे एक माजी आमदार व्यासपीठावरुन जाऊ लागल्याने त्यांच्या नावानेही शिमगा झाला. नंतर आक्रमक युवकांचा हा जमाव गंगापुर रोड, अशोक स्तंभ, मेहेर सिग्नल, महात्मा गांधी रोड, मध्यवर्ती बसस्थानक, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, गडकरी चौक व अन्य भागात घोषणा देत फिरला. हातात झेंडे, आक्रमक घोषणा यांनी शहरात काही वेळातच तणाव निर्माण झाला. दुकाने बंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद केली. वाहतुकही बंद झाली. यामध्ये अर्ध्या तासातच सबंध शहर बंद झाले. 

हा समुह मराठा समाजाचे कार्यकर्ते असलेल्या शैलेश कुटे यांच्या हॉटेलकडे गेला. तेथे त्यांना पिण्याचे पाणी दिले जात होते. मात्र तिथे हॉटेल बंद करण्यावरुन वाद झाला. येथे काही काळ रास्ता रोको झाला. पुढे हा जमाव महापालिकेकडे निघुन गेला. पोलिसांनी परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली. या घडामोंडींच्या दरम्यान सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन जाहीर केल्याप्रमाणे शांततेत सुरु होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख