Maharashtra Bandh Heavy Bandobast on Sion Panvel Road | Sarkarnama

#MaharashtraBandh सायन पनवेल महामार्गावर कडेकोट बंदोबस्त,वाहतुक तुरळक

अनिकेत गावडे 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

25 जुलै रोजी करण्यात आलेल्या मराठा आंदोलना दरम्यान आंदोलनाची सर्वात जास्त झळ पोहचलेल्या शीव-पनवेल महामार्गावरीस कळंबोली मॅकडोणाल्ड समोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पनवेल : 25 जुलै रोजी करण्यात आलेल्या मराठा आंदोलना दरम्यान आंदोलनाची सर्वात जास्त झळ पोहचलेल्या शीव-पनवेल महामार्गावरीस कळंबोली मॅकडोणाल्ड समोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या महामार्गावर वाहनांची संख्या तुरळक प्रमाणात दिसून येत आहे.

बंदच्या पार्श्वभूमिवर पोलीस दला तर्फे मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्ताच्या कामावर 6 पोलीस उपआयुक्त, 8 सहाय्यक पोलीस आयुक्त 100 पोलीस अधीकारी व 1500 कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाच्या 3 तुकड्यांसोबत जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथकांच्या 2 तुकड्या 40 पोलीस स्ट्रायकींग पथके, तसेच आधुनिक साधन सामग्री तैनात करण्यात आली असून, जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी वज्र व वरूण वाहने तैनात करण्यात आली आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख