#MaharashtraBandh औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहत शंभर टक्के बंद

मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ) पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील औद्योगिक वसाहती शंभर टक्के बंद आहेत. वसाहतींच्या चौकांमध्ये आंदोलकांनी ठिय्या करून बसलेल्या आंदोलकांनी कामगारांच्या वाटा रोखुन धरत त्यांना कंपनीत जाण्यापासून रोखले.
#MaharashtraBandh औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहत शंभर टक्के बंद

औरंगाबाद:  मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादेतील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि रेल्वेस्टेशन औद्यीगिक वसाहतींमधून मोठा प्रतिसाद मिळाला. कामगारांच्या वाहनांना आल्या पाऊली माघारी फिरावे लागल्याने कण सुरू ठेवणाऱ्या उद्योगांनाही काम थांबवावे लागले. 

मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ) पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील औद्योगिक वसाहती शंभर टक्के बंद आहेत. वसाहतींच्या चौकांमध्ये आंदोलकांनी ठिय्या करून बसलेल्या आंदोलकांनी कामगारांच्या वाटा रोखुन धरत त्यांना कंपनीत जाण्यापासून रोखले. सकाळी पहिल्या सत्राच्या शिफ्टपासूनच या वाहनांना माघारी पाठवण्यात आल्याने बजाज कंपनीमध्ये सुद्धा मनुष्यबळ पोचू शकले नाही.

एरव्ही सकाळी नऊ वाजता गजबजून जाणाऱ्या नगर महामार्ग मात्र शुकशुकाट पसरलेला आहे. सीमेन्स, ओएसीस चौकात आंदोलक थांबल्याने अनेक उद्योजकांना परिसरातील खेड्यांमधून परतीची वाट धरावी लागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com