Maharashtra Bandh Agitators gave way to Ambulance | Sarkarnama

#MaharashtraBandh माजलगाव, वडवणी, घाटनांदूरमध्ये रुग्णवाहिकेला दिला रस्ता

दत्ता देशमुख
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

माजलगाव चौकात हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र येत चक्काजाम आंदोलन सुरु झाले. याच वेळी रुग्णवाहिका आल्यानंतर आंदोलकांनी काही क्षणात वाट करुन दिली. तर, वडवणी येथे युवकांनी रस्त्यावर अर्धनग्न होत चक्काजाम सुरु केला. यावेळी रस्त्यावरच टायर पेटविण्यात आले. याच वेळी रुग्णवाहिका बीडच्या दिशेने जात असताना जळते टायर दुर करत रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यात आली. 

बीड : मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून जागोगाजी चक्काजाम आंदोलने सुरु आहेत. माजलगाव, वडवणी व घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे आंदोलकांनी रुग्णवाहिकेला रस्ता करुन दिला. 
गुरुवारी सकाळ पासून रस्ते आणि व्यापारपेठा सुनसान दिसत आहेत. बससेवा पुर्णपणे ठप्प असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. 

दरम्यान, माजलगाव चौकात हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र येत चक्काजाम आंदोलन सुरु झाले. याच वेळी रुग्णवाहिका आल्यानंतर आंदोलकांनी काही क्षणात वाट करुन दिली. तर, वडवणी येथे युवकांनी रस्त्यावर अर्धनग्न होत चक्काजाम सुरु केला. यावेळी रस्त्यावरच टायर पेटविण्यात आले. याच वेळी रुग्णवाहिका बीडच्या दिशेने जात असताना जळते टायर दुर करत रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यात आली. 

घाटनांदूर येथील चौकात चक्काजाम सुरु असताना आलेल्या रुग्णवाहिकेलाही वाट करुन देण्यात आली. जिल्ह्यात शाळा - महाविद्यालयांना सुटी घोषीत केली आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनेक ठिकाणी आंदोलक बैलगाड्यांसह रस्त्यावर येऊन चक्काजाम करत आहेत. नेकनूर, विडा येथेही टायर जाळल्याच्या घटना घडल्या.

संबंधित लेख