maharashtra band on tuesday | Sarkarnama

मंगळवारी 'महाराष्ट्र बंद'; मराठा क्रांती मोर्चाची हाक 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगांव टोका येथील गोदावरी पात्रात काकासाहेब शिंदे या तरूणाने उडी घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विरोधा मराठा क्रांती मोर्चाने उद्या, मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगांव टोका येथील गोदावरी पात्रात काकासाहेब शिंदे या तरूणाने उडी घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विरोधा मराठा क्रांती मोर्चाने उद्या, मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

रात्री आठ वाजता क्रांतीचौक येथील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. याआधी 9 ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र आज (ता.23) दुपारी कायगांव टोका येथील गोदावरी पात्रात कानडगांवच्या काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेत जलसमाधी घेतली. 

कायगांव येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आंदोलकांच्या वतीने गंगापूर तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना देण्यात आले होते. तरी प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यामुळेच काकासाहेब शिंदे याचा जीव गेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. 

या घटनेचे हिसंक पडसाद जिल्हा व राज्यभरातील काही भागात उमटले. क्रांतीचौकात देखील संतप्त आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत संताप व्यक्त केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. बंद दरम्यान, एसटी आणि वारकऱ्यांच्या वाहनाला कुठलीही इजा पोचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरीत उडी घेतल्यामुळे मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करावे, त्याच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत, कुंटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. 

संबंधित लेख