महिलांच्या तस्करीवरून लातुरच्या पाटील - देशमुखांचा विधानसभेत संघर्ष 

amit-deshmukh-sambaji-patil
amit-deshmukh-sambaji-patil

मुंबई  : लातुरच्या एका महिलेला मुलींच्या तस्करीत अटक केल्याचे प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. या प्रश्नावर गोंधळ होत लातुरचे राजकारणाचे उणे दुणे विधानसभेत निघाले. कामगार मंत्री  संभाजी पाटील निलंगेकर विरूध्द काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यात चांगलाच कलगी तुरी रंगला होता. 

कामगार मंत्री संभाजी पाटील निलेगंकरांनी अमित देशमुखांवर निशाणा  साधत म्हणाले,   "महिला तस्करी करणारी लातुरची ती महिला काँग्रेस पक्षाची महिला आहे. ती महिला काँग्रेस पक्षाचे काम करते. "ती" गेल्या पंधरा वर्षापासून महिलांच्या तस्करीचे रँकेट चालवते. "

 या आरोपाला प्रतिउत्तर देताना काँग्रसचे आमदार अमित देशमुख म्हणाले, " लातुरसह राज्यातील 14 जिल्ह्यात महिलांची तस्करी  सुरू असताना सरकारचे लक्ष कुठे आहे ? गृह खात्याचा कारभार कसा सुरूयं ? लातुरच्या पालकमंत्र्यांच्या नाकाखाली नाकाखाली ही तस्करी सुरू आहे. ते काय करत आहेत ? कुठल्याही पक्षाला दोषारोप करून या प्रश्नाची सुटका होणार नाही. हा अतिश गंभीर  विषय आहे. 14 जिल्ह्यात महिलांची तस्करी सुरू असताना सरकार काय करत आहे ? असा जाब अमित देशमुखांनी विचारला.

अमित देशमुख यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर निलंगेकरही आक्रमक झाले . पलटवार करताना  निलंगेकर  म्हणाले, "  लातुरशी संबंधीत अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. सरकार  गंभीर  आहे म्हणूनच चौकशी सुरू आहे. सरकारने चौकशी केल्यामुळेच गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेला हा प्रकार उघकीस आला आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com