Maharashtra Assembly Haribhau Bagde | Sarkarnama

तुम्ही पुढे येऊन बसा तरच संधी मिळेल : विधानसभा अध्यक्ष कडाडले

गोविंद तुपे
गुरुवार, 27 जुलै 2017

मुंबईतील परळ येथील हाफकीन संस्थेची पाच एकर जागा टाटा मेमोरियल सेंटरला दिल्याबाबतच्या तारांकित प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू होती. कॅन्सर हॉस्पिटल हा सर्वांच्याच जीवळ्याचा विषय असल्याने या प्रश्नावर बोलण्यासाठी संधी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात आमदारांनी मागणी केली.

मुंबई : विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासाला प्रत्येक विषयावर बोलण्यासाठी संधी मिळावी अशी मागणी आमदार करत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे जोरदार संतापले. आणि 'एका पक्षातील एकाच नेत्याला आणि तीही पहिल्या रांगेतील नेत्यालाच संधी मिळेल. ज्यांना कुणाला बोलायचे असेल तर त्यांनी पुढे येऊन बसावे' असेही अध्यक्ष म्हणाले.

मुंबईतील परळ येथील हाफकीन संस्थेची पाच एकर जागा टाटा मेमोरियल सेंटरला दिल्याबाबतच्या तारांकित प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू होती. कॅन्सर हॉस्पिटल हा सर्वांच्याच जीवळ्याचा विषय असल्याने या प्रश्नावर बोलण्यासाठी संधी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात आमदारांनी मागणी केली. त्यावर संतापलेल्या अध्यक्षांनी 'फक्त तुम्हालाच संधी द्यायच्या का,' असा भाजपाच्या दोन आमदारांना प्रति सवाल करताच सभागृहात सर्वत्र हशा पसरला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनीही आम्हाला संधी मिळावी अशी मागणी करीत हात वर केल्याने अध्यक्ष आणखीच संतापले. त्यामुळे 'एका पक्षाच्या एकाच व्यक्तीला बोलायला संधी मिळेल. जर ज्यांना बोलायचे असेल तर त्यांनी पहिल्या रांगेत यावे,' असे सांगत आमदारांचीच कोंडी केली. कारण पहिल्या रांगेत सर्वच वरिष्ठ आमदार बसलेले असतात.

संबंधित लेख