Maharashtra assembly debate | Sarkarnama

बाजारात तुरी अन् विधानसभेत आमदारांची हमरी तुमरी !

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई  : राज्यातील तूर खेरदीवरून गेल्या तीन महिन्यापासून   गोंधळ सुरू आहे. आज विधानसभेत तूर खेरेदीवरून भाजप आमदार संजय कुटे यांना तुर खरेदीच्या गोंधळाला काँग्रेस राष्ट्रवादीला जबाबदार धरले.

त्यामुळे विरोध सत्ताधारी आमदारांमध्ये एकच गोंधळ झाला. त्यामुळे "बाजारात तुरी अन् विधानसभेत आमदारांची हमरी तुमरी" असे चित्र निर्माण झाले होते. 

नियम 297 अन्वये शेतकरी कर्जमाफीबद्दल सत्ताधारी भाजपच्या आमदारांना सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला यावेळी बोलताना भाजप आमदार संजय कुटे यांनी विरोधकांवर चौखूर टीका केली. आमदार संजय कुटे म्हणाले, राज्यातील खरेदी विक्री संघ तुमच्या ( विरोधकांच्या) ताब्यात आहेत. तुम्ही अन् तुमच्या अन् तुमच्या कार्यकर्त्यांनी तुर घोटाळा करत राज्यातील शेतकऱ्यांना नागवले आहे. खरेदी विक्री संघ, काँटन मील ही सगळी यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांची जाणूनबुजून अडचण केली. तुर घोटाळ्याच्या आरोपात जळगाव जामोद (बुलढाणा)  मतदार संघातील काँग्रेस राष्ट्रवादीचे बाजार समितीचे संचालकांना अटक झाल्याचे सांगत संजय कुटे यांनी विरोधकांना कोंडीत पकडले. 

यामुळे दुखावलेले विरोधी आमदार विरेंद्र जगताप यांनी " सरकार तुमचे आहे मग दोषींना शिक्षा का देत नाही असा प्रश्न विचारला. तर विरोधी पक्षाचे काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपतील व्यापारी नाही का असा प्रश्न उपस्थीत केला. या गोंधळात अखेर आमदार संजय कुटे यांनी तूर खरेदीच्या दरोडेखोरीमध्ये भाजपच्या पाच टक्के लोकं असतील तर 95 टक्के काँग्रेस राष्ट्रवादी असतील असे सांगितले. दोन्ही बाजूच्या आमदारांनी एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करत तु तू मै मै केली. 

संबंधित लेख