Mahadik Patil may have to pay the price for multi state issue in elections | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मल्टिस्टेट रेटणाऱ्या महाडिक - पाटलांना लोकसभा -विधानसभा खडतर ?

सुनील पाटील  
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

मल्टिस्टेटचा विषय पुढे रेटून  विरोधकांच्या सापळ्यात महाडिक अडकतात की सध्या मल्टिस्टेटचा  विषय बाजूला ठेवून आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे . 

कोल्हापूर  : गोकुळ मल्टिस्टेला जिल्ह्यातून विरोध होत आहे. गोकुळच्या सभेत सभासदांना डावलून मल्टिस्टेटचा ठराव खासदार धनंजय  महाडिक आणि माजी आमदार पी . एन  . पाटील यांनी  रेटून मंजूर करण्याचा प्रयत्न केला  तर  विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत त्याची किंमत मोजावी लागू शकते असे  चित्र कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मल्टिस्टेटचा विषय हे नेते किती ताणून धरतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे . 

गोकुळ मल्टिस्टेट करण्यावरून जिल्ह्यात सुरू असलेले मेळावे, चर्चा, बैठकी, पत्रकार परिषदेमधून होणाऱ्या टिका, आरोप, प्रतिआरोप पाहता सभासदांना विश्‍वासात घेवूनच हा निर्णय घ्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाहीतर सभासदांकडून ' मल्टिस्टेटचा वचपा' विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत काढला जावू शकतो, असे राजकीय निरीक्षकांना वाटते . 

गोकुळ हा जिल्ह्याचा संघ आहे. जिल्ह्यातील पाच हजार दूध संस्था गोकुळला दूध पुरवठा करतात. तर, साडे पाच लाख दूध उत्पादक याच गोकुळचे मालक आहेत. तरीही, गोकुळ मल्टिस्टेट करण्यासाठी सत्तारूढ संचालकांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, गोकुळ मल्टिस्टेट करावा का ? तसेच गोकुळबाबतचे इतर प्रश्‍न जाणून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात विद्यमान संचालकांनी संर्पक सभा घेतल्या. यापैकी 90 टक्केहून अधिक सभांमध्ये गोकुळ मल्टिस्टेट करण्याला विरोध झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे . तरीही, वार्षिक सभेपुढे हा ठराव ठेवला जाणार आहे. गेल्या काही वार्षिक सर्वसाधारण सभेचा अनुभव पाहता. मल्टिस्टेटचा ठरावही रेटून मंजूर केला जाईल का? अशी भिती सभासद व शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. 

अनेक संभासद दूध संस्था विद्यमान संचालकांच्या दडपणाखाली आहेतअसा आरोप सतेज पाटील  , राजू शेट्टी , चंद्रदीप नरके आदी  लोकप्रतिनिधींनी  मेळाव्यामध्ये केलेला आहे . त्यामुळे गुप्त मतदानाद्वारे मल्टिस्टेटबाबत मत जाणून घेण्याची मागणी होते आहे. लोक आपले राग व्यक्त करण्यासाठी किंवा मल्टिस्टेट होण्याला पाठबळ देण्यासाठी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करत आहेत. यावरूनच गोकुळच्या सभासदांच्या मुख्य प्रश्‍न काय आहेत, हे जाणून घेण्याऐवजी विद्यमान संचालकही गोकुळ मल्टिस्टेट करण्यामागे लागले असल्याचे चित्र आहे. 

सरवडे येथील विठ्ठलाई दूध संस्था, शिरोली दुमाला येथील हनुमान दूध संस्था, गाडेगोंडवाडी येथील हनुमान दूध संस्था, शिदेवाडी येथील सिध्देश्‍वर दूध संस्था, मालवे येथील आमदार किसनराव मोरे दूध संस्थेने सहकार न्यायालयात गोकुळ मल्टिस्टेट व्हावा की नको याबाबत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असा दावा दाखल केला आहे. 

आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार हसन मुश्रीफ तसेच खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळ मल्टिस्टेट होण्याला जाहीर मेळावे, पत्रकार परिषद आणि निवेदन देवून विरोध केला आहे.  धनंजय महाडिक यांचे राजकीय विरोधक या मुद्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत .

या विषयावरून जनमत महाडिकांविरुद्ध करण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत . मल्टीस्टेट हा प्रतिष्ठेचा मुद्दा करून महाडिकांना या मुद्द्यावर आता माघार घेणे अवघड करण्याचे विरोधकांचे डावपेच आहेत . त्यामुळे मल्टिस्टेटचा विषय पुढे रेटून  विरोधकांच्या सापळ्यात महाडिक अडकतात की सध्या मल्टिस्टेटचा  विषय बाजूला ठेवून आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे . 

 

संबंधित लेख