mahadik and shahu | Sarkarnama

खासदार महाडिकांकडून देशातील सर्व खासदारांना शाहू चरित्रग्रंथाची भेट

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे प्रयत्न सुरु आहेत. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी त्यांनी देशातील सर्व खासदारांना राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथ भेट म्हणून पाठवला आहे. देशातील सर्वच खासदारांनी राजर्षि शाहू महाराजांचे चरित्र वाचावे आणि या महान लोकराजाला भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे. 

दिवाळीचे औचित्य साधून खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील सर्व खासदारांना एक अनोखी भेट दिली आहे. ही भेट आहे, कोल्हापूरचे दैवत असणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचा चरित्रग्रंथ ! ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला हा चरित्रग्रंथ खासदार धनंजय महाडिक यांनी देशभरातील सर्व खासदारांना पाठवला आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर देशभरातील सर्व खासदार, राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहितील आणि त्यातून आपली मागणी पूर्णत्वास जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

समतेचे आणि विकासाबाबत द्रष्टे असलेल्या राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी यापूर्वीच केली आहे. संसदेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कोल्हापुरातील विविध व्यक्ती, संस्था यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून,राजर्षि शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत विनंती करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याच्या पुढचा टप्पा आणि पाठपुरावा म्हणून खासदार महाडिक यांनी देशातील सर्व खासदारांना शाहू चरित्रग्रंथ भेट म्हणून पाठवला आहे. 

संबंधित लेख