mahadik and patil | Sarkarnama

चंद्रकांतदादांकडून महाडिक यांच्या खासदारकीची तर अमल यांच्या मंत्रिपदाची ग्वाही

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांचा लोकसभेसाठीचा पक्ष कोणता असेल हे माहीत नसले तरी ते खासदार होणार आणि आमदार अमल महाडिक हे मंत्री होणार, असे भाकीत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. कोल्हापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, एका कॉलनीमध्ये एकूण पाच हजार घरे आहेत. ती घरे नवीन कधी होतील माहिती नाही. तोपर्यंत या पाच हजार घरांचे गिलावे पूर्ण करून रंगरंगोटी करायला सांगितले तर ते काम करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे अनेक लोक उत्सुक आहेत आणि ते यासाठी माझ्या संपर्कात आहेत. 

धनंजय महाडिक हे खासदार होण्याआधीपासून लोकोपयोगी कामावर खर्च करत आहेत. सदर बाजारमधील सुमारे 200 विद्यार्थ्यांना महाडिक यांनी शिक्षणाची सोय करू दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, नगरसेविका स्वाती माने, मारुती माने आदी यावेळी उपस्थित होते. 

संबंधित लेख