mahadik and mandalik | Sarkarnama

"सातनंतर नॉट रिचेबल' असणारे आता निवडणुकीसाठी छत्रीसारखे बाहेर आले - धनंजय महाडिक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : नॉट रिचेबल उमेदवार आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी छत्रीसारखे बाहेर आले आहेत. त्यामुळे या कार्यकालात केलेल्या कामाच्या आधारे मतांचा इतका वर्षाव करा की विरोधकाला भविष्यात निवडणुकीची तल्लफच येता कामा नये, अशी सणसणीत टीका राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांचेवर नाव न घेता केली. करवीर तालुक्‍यातील वाकरे येथे कार्यक्रमात ते बोलत होते. 

जनतेने गेल्या निवडणुकीत मला निवडून दिले. या काळात मी अनेक प्रकल्प मार्गी लावले आहेत. जिल्ह्यातील विकासकामांसाठी साडे सहा हजार कोटींचा निधी आणला आहे. या कामाच्या बळावर कोल्हापुरची जनता मला पुन्हा संसदेत पाठवेल, यात काही शंका नाही, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्‍त केला. तसेच निधी आणण्यासाठी संसदेत प्रश्‍न मांडावे लागतात, सादरीकरण करावे लागते. मात्र प्रश्‍न मांडले म्हणून काय झाले, अशी विचारणा विरोधक करत आहेत, या वक्‍तव्याचा समाचार महाडिक यांनी घेतला. 

प्रा.मंडलिक यांच्यावर टीका करताना खा. महाडिक म्हणाले, काही लोक हे निवडणुकीच्यावेळीच बाहेर पडतात. सायंकाळी सात नंतर नॉट रिचेबल असणारे उमेदवार आता फिरु लागले आहेत. त्यांची ही निवडणुकीची हौस या निवडणुकीत कायमची भागवण्याचा सल्लाही खा.महाडिक यांनी उपस्थितांना दिला. ते म्हणाले, मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतांचा इतका पाउस पाडा की, विरोधी उमेदवाराला पुढे निवडणूक लढण्याची तल्लफच येणार नाही. 

संबंधित लेख