mahadik and loksabha election | Sarkarnama

चंद्रकांतदादांच्या वक्‍तव्याने महाडिक विरोधकांना आयता मुद्दाच मिळाला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक हे पुन्हा खासदार होण्याचे जे भाकीत केले त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. असे असताना भाजपचे राज्यातील ज्येष्ठ मंत्री त्यांच्या विजयाची खात्री देत असल्याबददल तर्कवितर्क सुरु झाले आहेत. अगोदरच राष्ट्रवादीत खासदार महाडिक यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु आहे. असे असताना पालकमंत्री पाटील यांनी असे वक्‍तव्य करुन महाडिकांच्या अडचणीत भरच घातल्याचे बोलले जात आहे. 

पालकमंत्री पाटील यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे पुन्हा खासदार होतील असे भाकीत केले. हे करत असतानाच त्यांनी महाडिक हे कोणत्या पक्षातून खासदार होतील, हे मात्र अजून अस्पष्ट असल्याचेही मान्य केले. पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्‍तव्याला खासदार महाडिक यांनीही दुजोरा दिला. पक्ष कोणताही असला तरी 2019 च्या निवडणुकीत आपणच खासदार होणार, असा विश्‍वास महाडिक यांनी ठामपणे व्यक्‍त केला आहे. पालकमंत्री पाटील व महाडिक यांच्या या वक्‍तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 

खासदार धनंजय महाडिक यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताकदीवर मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. या विजयानंतर मात्र महाडिक यांनी जिल्ह्यात सवता सुभा करत भाजपशी जवळीक साधली. विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी त्यांचे चुलतबंधू भाजपचे आमदार अमल महाडिक यांना मदत केली. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत तर त्यांनी भाजप सदस्यांच्या वाहनाचे सारथ्य केले. परिणामी राष्ट्रवादीतील एक गट महाडिकांविरोधात आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीत महाडिक यांच्या विरोधातला विरोध उफाळून आला. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीही वेळोवेळी खासदार महाडिक यांच्या पक्षविरोधी भूमिकेवर टीका केली आहे. तसेच लोकसभेला पर्यायी उमेदवाराची चाचपणीही केली आहे. 

महाडिक यांना राष्ट्रवादीतून विरोध वाढत आहे. त्यामुळेच त्यांना अजून पक्षाने उमेदवारीबाबत ग्रीन सिग्नला दिलेला नाही. परिणामी महाडिक कधी राष्ट्रवादीतून खासदार होणार असल्याचे सांगतात तर कधी आपणच खासदार होणार असलो तरी पक्ष ठरला नसल्याचेही सांगतात. राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत संशयाचे धुके निर्माण झाले असतानाच पालकमंत्री पाटील यांनी महाडिक हे खासदार होणार असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे. कदाचित पालकमंत्री हे उमेदवारीबाबत चाचपणी करत असण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. मात्र पालकमंत्र्यांच्या या वक्‍तव्याने महाडिक यांची मात्री राष्ट्रवादीत आणखी कोंडी होवू शकते. त्यांच्या वक्‍तव्याने महाडिक विरोधकांना आणखी एक कोलीत प्राप्त झाले आहे, हे मात्र नक्‍की. 

संबंधित लेख