Mahadevrao Mahadik goes to Satej Patil's house | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

महादेवराव महाडिक आमदार सतेज पाटील यांच्या घरी !

सुनील पाटील
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

या पार्श्वभूमीवर आमदार महाडिक यांनी आज सकाळी 8.30 वाजता नेजदार यांच्या बावडा येथील घरी भेट घेतली. तसेच विश्वास नेजदार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मारहाण होणे चुकीचे आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी त्यांनी नेजदार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघावरून जिल्ह्याचे राजकीय वातावरण भयंकर तापलेले असताना ज्येष्ठ नेते   आमदार महादेवराव महाडिक  यांनी आपले राजकीय विरोधक  आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन  आमदार सतेज पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न केला. महाडिकांच्या या खेळीने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे . 

 जिल्हा सहकारी  दूध संघाच्या (गोकुळ) करवीर संपर्क सभेत जेष्ठ कार्यकर्ते विश्वासराव नेजदार यांना झालेल्या मारहाणीनंतर आमदार सतेज पाटील समर्थक आणि  नेजदार  परिवार यांनी काल (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन आक्रमक पवित्रा घेतला होता.

दरम्यान आज (शुक्रवारी) आमदार महाडिक यांना  कसबा बावड्यात आणि  गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना गोकुळ मध्ये फिरकु देणार नाही असे आव्हान नेजदार तसेच त्यांचे पुतणे संदीप नेजदार यांनी दिले होते . 

या पार्श्वभूमीवर आमदार महाडिक यांनी आज सकाळी 8.30 वाजता नेजदार यांच्या बावडा येथील घरी भेट घेतली. तसेच विश्वास नेजदार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला मारहाण होणे चुकीचे आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी त्यांनी नेजदार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. 

तत्पूर्वी  आमदार महादेवराव महाडिक  यांनी 8.15 वाजता  आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन  आमदार सतेज पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न केला. आमदार पाटील यांच्या बाबत सुरक्षा रक्षकाकडे विचारणा  केली. आमदार पाटील पुणे येथे गेल्याचे सांगितल्यावर डॉ. नेजदार यांच्या घरी गेली.

संबंधित लेख