mahadev janksr supports pankaja munde for cm post | Sarkarnama

फडणवीस चांगलेच आहेत, पण पंकजा मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून चांगलेच आहेत, मात्र पंकजा मुंडे यांनाही ती संधी मिळाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्‍त केले. 

पुणे: देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून चांगलेच आहेत, मात्र पंकजा मुंडे यांनाही ती संधी मिळाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्‍त केले. 

कात्रज येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. जानकर म्हणाले, रासप पक्ष छोटा असलातरी सन्मान देण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री आहेत. त्यांचे कतृत्वही मोठे आहे, पण पंकजा मुंडे यांनाही संधी मिळाली पाहिजे. ओबीसी नेतृत्व आणि महिल नेतृत्व म्हणून त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. 

संबंधित लेख