Mahadev Jankar urges Uddhav Thakre to make alliance | Sarkarnama

महादेव जानकरांचे उद्धव ठाकरेंना युती करण्याचे  आवाहन 

दीपक क्षीरसागर  
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

रासप  युती सोबतच राहून निवडणुक लढवणार आहे

- महादेव जानकर

लातूर : " आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुका या युती करून लढवाव्यात . रासप हा युती सोबतच राहून निवडणुक लढवणार आहे . इतर पक्षांच्या अध्यक्षांनी योग्य निर्णय घ्यावा ," अशा शब्दात पशुसंवर्धन  मंत्री महादेव जानकर यांनी उद्धव ठाकरे यांना  आवाहन केले.  महादेव जानकर   यांनी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे थेट नाव घेतले नसले तरी हे आवाहन ठाकरेंना उद्देशून आहे . 

चार महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने सांगितले आहे. चाराटंचाई अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाकडून १० कोटीचा निधी उपलब्ध झाला असून दुष्काळात जनावरांना चारा आणि पाणी कमी पडू देणार नाही ,"असे  पशुसंवर्धन तसेच दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यातील लोदगा गावी आयोजित कार्यक्रमात बोलत होते

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील कन्हेरी मठाचे काडसिध्देश्वर स्वामी, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, डॉ.एस.एन. सुर्यवंशी, डॉ. नितीन मार्कडेय यांच्यासह लोदगा आणि परीसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

''राम मंदिराचा प्रश्न हा न्यायालयाचा आहे.  लोकभावना व न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र सरकारने योग्य ती कार्यवाही करावी," असेही श्री. जानकर यावेळी बोलताना म्हणाले . 

दुष्काळी परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले ," राज्य शासनाच्या वतीने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारायुक्त शिवार ही  योजना हाती घेत आहे .  शेतकऱ्यांना   डीबीटी योजनेत खात्यावर पैसे जमा केले जातील तर आवश्यकतेनुसार महिला बचत गटामार्फत चारा डेपो सुरु केले जाणार आहे . अतिनिकड असल्यास चारा छावण्या शासन सुरु करण्याच्या मानस आहे."

 

संबंधित लेख