mahadev jankar public meeting in dehli | Sarkarnama

21 वर्षानंतर महादेव जानकरांचा दिल्लीत मेळावा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे 21 वर्षानंतर दिल्लीत मेळावा घेत आहेत. यानिमित्ताने पक्षाचा ठसा देशपातळीवर उठवण्याचा त्यांचा मानस आहे. 

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे 21 वर्षानंतर दिल्लीत मेळावा घेत आहेत. यानिमित्ताने पक्षाचा ठसा देशपातळीवर उठवण्याचा त्यांचा मानस आहे. 

जानकर यांनी 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. तत्पुर्वी ते यशवंत सेनेच्या माध्यमातून कार्यरत होते. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी 1997 मध्ये त्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात महाराष्ट्रातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यावेळी बसप संस्थापक कांशिराम यांच्यासह बसपच्या खासदारांनी मोर्चाला संबोधित केले होते. आरक्षण मागत बसण्यापेक्षा सत्ताधारी होवून समाजाचे प्रश्‍न सोडवा, असा संदेश कांशीराम यांनी दिला होता. त्यानंतरच वाटचालीत जानकर यांनी राजकीय सत्ता मिळवण्याचा एजेंडा ठेवला.2003 मध्ये रासपची स्थापन केला. 2014 ला रासपला एनडीएमध्ये स्थान मिळाले, 2016 ला राज्याच्या सत्तेत वाटा मिळाला. 

या वाटचालीनंतर रासपने राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पाडण्यासाठी दिल्लीत 29 ऑगस्टला पक्षाच्या वर्धापनदिनाचे दिल्लीत आयोजन केले आहे. काल विधीमंडळात महादेव जानकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा शपथविधी पार पडला. यानंतर पक्षाध्यक्ष एस. एल. अक्‍कीसागर यांच्या उपस्थितीत  बैठक पार पडली. बैठकित वर्धापन दिनाचा कार्यक्रम दिल्लीत घेण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. 

गेल्यावर्षी रासपचा वर्धापनदिन सूरतमध्ये पार पडला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत रासपने शिवसेनेपेक्षा जास्त मते घेतली होती. गेल्या काही महिन्यांत उत्तर प्रदेशात रासपचे काम वाढले आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशमधील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. 

संबंधित लेख