mahadev jankar memories about gopinath munde | Sarkarnama

मुंडेंसारख्या लोकनेत्याने मुलगा मानले, ही आयुष्यातील खूप मोठी गोष्ट! 

संपत मोरे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती.

''माणदेशातील पळसावडेसारख्या आडवळणी गावातून एका गरीब कुटुंबातून मी आलो आहे. बहुजन समाजाचं एक पर्यायी राजकारण उभा करण्यासाठी मी लढत राहिलो. लोकांच्या बळावर पर्यायी राजकारण उभा राहीलं. याचकाळात गोपीनाथ मुंडे यांची भेट झाली. माझ्यातला लढवय्या कार्यकर्ता पाहून ते माझ्यावर प्रेम करू लागले. त्यांनी मला मुलगा मानलं...''

राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर सांगत होते.

गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. त्यानिमित्ताने जानकर म्हणाले, त्यांच्यासारख्या लोकनेत्याने मला मुलगा मानले, ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे. मुंडेसाहेबांनी माझ्यावर खूप प्रेम केले. आज साहेब नाहीत याचं खूप दुःख होतय. आज मी मंत्री म्हणून काम करतोय, हे बघायला ते हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता. मी आणि माझ्या भगिनी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आम्ही आयुष्यभर साहेबांनी सांगितलेल्या वाटेवरून प्रवास करणार आहोत. आम्ही दोघे साहेबांनी ज्या उपेक्षित लोकांच्या विकासासाठी राजकारण केलं 
तोच वसा आम्ही चालवणार आहोत."असं जानकर म्हणाले. 

संबंधित लेख