mahadev jankar assembly news | Sarkarnama

मी राज्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागतो : महादेव जानकर 

गोविंद तुपे 
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई ः पशुसंवर्धव विभागातील लस खरेदीची प्रक्रिया चूकीची राबवून गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासाला केला. त्यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या सवाल जवाबाची चांगलीच जुगलबंदी रंगली होती. त्यावेळी तांत्रित अडचणीमुळे जनावरांना वेळेत लस देण्यास वेळ लागला याप्रकरणी मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माफी मागतो असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. 

विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला लस खरेदी प्रक्रिया नियमबाह्यपणे राबविली गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. तसेच यामध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती आम्ही हिवाळी अधिवेशनातच उपस्थित केली होती. त्यावेळ खुद्द मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी झाली का असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.

त्यावर उत्तर देताना खोतकर यांनी चौकशी झालीच नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर आक्रमक झालेल्या धनंजय मुंडे यांना उत्तर देण्यासाठी जानकर उभे राहिले. त्यानंतर सात वेळा निविदा काढण्याची कारणे स्पष्ट केली. तसेच यामुळे शेतकऱ्यांना लस देण्यास वेळ झाल्याने मी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागतो असेही जानकर यांनी स्पष्ट केले. त्यावेळी स्वतंत्र यंत्रणेमार्फत याप्रकरणाची चौकशी करून अधिवेशनापुर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले.  

संबंधित लेख