mahadev jankar and raju shetty | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

राजु शेट्टी - महादेव जानकरांची रंगली गप्पाची मैफल !

श्रीकांत पाचकवडे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

ऊस दर नियंत्रण समितीच्या बैठकीसाठी खासदार शेट्टी, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीष काकडे, राज्य साखर महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक गुरूवारी मंत्रालयात गेले होते. राजू शेट्टी मंत्रालयात आल्याची माहिती मिळाल्यावर जानकरांनी त्यांना फोन करून बोलावले.

अकोला : सत्ताधारी असो की विरोधक, राजकीय क्षेत्रातील दोन नेत्यांची मैत्री हा चर्चेचाच विषय ठरतो. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप महायुतीतून बाहेर पडल्यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची घटक पक्षातील अनेक नेत्यांशी आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांची मैत्री त्यापैकीच एक म्हणावी लागले. गुरूवारी मंत्रालयात बैठकीसाठी गेलेल्या या दोन्ही मित्रांनी गळाभेट घेत बराच वेळ गप्पाची मैफल रंगवली. 

सत्ताधारी भाजप सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरत असल्याचा हल्लाबोल करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी " एनडीए' ला सोडचिठ्ठी दिली. स्वाभिमानीचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी वस्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देत अध्यक्ष म्हणुन मिळणाऱ्या सर्व सुविधांचा त्याग केला. त्यानंतर सत्ताधारी विरुद्ध स्वाभिमानी संघटना अशी आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली. 

खासदार शेट्टी "एनडीए' तून बाहेर पडले असले तरी एनडीएचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासोबतची त्यांची मैत्री आजही कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेले महादेव जानकर यांनी खासदार शेट्टी घरी नसताना त्यांच्या घरी सदिच्छा भेट देत शेट्टींच्या मातु:श्रींचे आशिर्वाद घेतले होते. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. 

ऊस दर नियंत्रण समितीच्या बैठकीसाठी खासदार शेट्टी, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीष काकडे, राज्य साखर महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक गुरूवारी मंत्रालयात गेले होते. राजू शेट्टी मंत्रालयात आल्याची माहिती मिळाल्यावर जानकरांनी त्यांना फोन करून बोलावले. शेट्टी-जानकर या मित्रांची पुन्हा एकदा गळाभेट झाली. यावेळी सोबत जेवण करीत बराच वेळ त्यांच्यात गप्पाची मैफल रंगली. ही भेट केवळ सदिच्छा भेट असल्याचे खासदार शेट्टी यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत असले तरी सोशल मिडीयावर या भेटीच्या निमित्याने " शेट्टी-जानकर हम साथ साथ है' अशी चर्चा रंगली आहे. 
 

संबंधित लेख