mahadev jankar agnry on party worker | Sarkarnama

चौकात उभी राहयची लायकी नाही अन्‌ निघाले नगरसेवक व्हायला, मंत्री जानकरांचा संताप 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नाशिक : "" तुमची चौकात उभे राहायची लायकी नाही अन्‌ नगरसेवक व्हायचे स्वप्न बघता ?'' असा संतप्त सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकार यांनी येथे केला. 

नाशिक : "" तुमची चौकात उभे राहायची लायकी नाही अन्‌ नगरसेवक व्हायचे स्वप्न बघता ?'' असा संतप्त सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकार यांनी येथे केला. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिविसर्जन कार्यक्रमासाठी ते नाशिकला आले होते.यावेळी त्यांनी सिडकोतील सुरेशा प्लाझा येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थिती लावली. मेळाव्याला उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेंद्र पोथारे, महासचिव बाळासाहेब दोडतले उपस्थित होते. मात्र, मेळाव्याला कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुका सदस्यांनीच दांडी मारली. जेमतेम उपस्थितीने सारेच बुचकळ्यात पडले. मेळाव्यातील अल्प उपस्थिती पाहून जानकरांचा पारा चांगलात चढला. 

शेवटी दोन आठवड्यांचा अल्टिमेटम देत, अहवाल देण्याचे आदेश देत त्यांनी खरपूस समाचार घेतला. जानकर म्हणाले, "" चौकात साधी पक्षाची शाखा नाही आणि नगरसेवक होण्याचे स्वप्न बघता. तुमच्याकडून पक्षवाढीची अपेक्षा कशी बाळगायची ? पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला जिल्हा कार्यकारिणीच उपस्थित राहत नाही. दिल्ली तर दूरच आहे. इथे चौकात आपली उभी राहण्याची लायकी नाही. नगरसेवक होण्याची स्वप्न कसले बघता ?'' 

संतापलेले मंत्रीमहोदय शेवटी म्हणाले, "" मी ब्रह्मचारी माणूस आहे; मला फसवू नका. बेकार शाप लागेल ! ''  

संबंधित लेख