mahadeorao mahadik stand against saej patil in assembly election | Sarkarnama

सतेज पाटलांविरूद्ध विधानसभेला मीच लढणार : महादेवराव महाडिक

सुनील पाटील
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

दक्षिण मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्याविरूध्द केवळ बावीस दिवसाचा प्रचार करून अमल महाडिक विजयी झाले होते.

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून 2019 ची निवडणूक लढविण्यास आमदार अमल महाडिक इच्छुक नसतील तर मी स्वत: या मतदार संघात निवडणूक लढविणार, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केली.

'कॉफी वुथ सकाळ' मध्ये ते बोलत होते.

श्री महाडिक म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणूकीत अमल महाडिक निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. आपण स्वत: त्यांना निवडणूक लढविण्यास भाग पाडले. मला या विधानसभा मतदार संघातील गावे अजून माहिती नाहीत. निवडणूक लढवायची तर प्रचार करायला पाहिजे, अशी कारणे अमल महाडिक यांच्याकडून सांगितली जात होती. तरीही, प्रचार कसा करायचा, निवडूण कसे यायचे हे मी पाहतो, तुम्ही फक्त अर्ज भरा म्हणून उभे केले आणि अमल महाडिक यांना विजयी केले. तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे.

यावर्षी कोल्हापूर लोकसभेसाठी खासदार धनंजय महाडिक हा अश्‍वमेघ सोडला आहे. शिराळ्यातून सम्राट महाडिक आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून लढण्यास अमल महाडिक यांनी नकार दिला तर आपण स्वत: लांग घालून मैदानात उतरू अशी घोषणाही केली. त्यामुळे 2019 मध्ये आमदार सतेज पाटील यांच्याविरूध्द आमदार अमल महाडिक रिंगणात नसतील तर माजी आमदार महादेवराव महाडिक असतील, हेच श्री महाडिक यांच्या घोषणेवरून स्पष्ट झाले आहे. 

संबंधित लेख