mahadeo jnakar lifts gaurav khade in savargaon | Sarkarnama

सावरगावात महादेव जानकरांनी गौरव खाडेंना उचलून घेतले! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

जानकर अमित पालवे आणि गौरव खाडे यांचा उल्लेख भाऊजी असा करत असतात.

बीड : सावरगाव येथे सुरू असलेल्या दसरा मेळाव्यात प्रास्ताविकात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी काही नावांत पती गौरव खाडे यांचे नाव घेताच प्रचंड घोषणा आणि टाळ्या झाल्या. 

'मला वाटले फक्त भाऊजीला (पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे) यांनाच फालोअर्स आहेत असे वाटत होते पण माझ्या पतीलाही आहेत. आता महादेव जानकर यांनी त्यांना रासपमध्ये घ्यायला हरकत नाही, असे म्हणताच महादेव जानकर यांनी गौरव खाडे यांना उचलून घेतले. यानंतर एकच घोषणा आणि टाळ्या झाल्या. 

महादेव जानकर हे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात. पंकजा मुंडे यांचेही ते समर्थक मानले जातात. जानकर आणि पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांचे मौत्रीचे संबंध आहेत. जानकर आणि पंकजा व प्रीतम यांच्यात बहीण भावांचे नाते आहे. त्यामुळे जानकर अमित पालवे आणि गौरव खाडे यांचा उल्लेख भाऊजी असा करत असतात.

संबंधित लेख