Mahadeo Jankar leaves meeting with CM | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

खोतकर कन्येच्या साखरपुड्यासाठी जानकर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून सटकले 

तुषार खरात 
शनिवार, 13 मे 2017

पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचीही अशीच पंचाईत झाली अन्‌ त्यांना कर्तव्यापेक्षा मित्रत्वाच्या संबंधांना अधिक महत्त्व द्यावे लागले. 

मुंबई : आपले कर्तव्य महत्त्वाचे की नातेसंबंध महत्त्वाचे अशी दोलायमान स्थिती सामान्य माणसांची होत असते. पशू व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचीही अशीच पंचाईत झाली अन्‌ त्यांना कर्तव्यापेक्षा मित्रत्वाच्या संबंधांना अधिक महत्त्व द्यावे लागले. 

त्याचे झाले असे की, पशू व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कन्येचा शुक्रवारी लोणावळ्यात शाही साखरपुडा होता. या शाही सोहळ्यासाठी खोतकर यांनी जानकरांना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. पण याच दिवशी जानकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक होती. ही बैठक दुपारी होती व साखरपुडा सायंकाळी होता. परंतु मुख्यमंत्र्यांना बैठकीला यायला उशीर झाला. त्यामुळे साखरपुड्याची वेळ 
चुकणार की काय या धास्तीने जानकर यांची चलबिचल सुरू झाली. अखेर "मला खोतकर यांच्या कन्येच्या साखरपुड्याला जायचे आहे' असे सांगून जानकर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. 

जोगेश्वरी मतदारसंघातील विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन केले होते. या मतदारसंघात असलेली आरे डेअरी व पशू वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर पशू व दुग्धविकास खात्याच्या कार्यकक्षेत आहे. त्यामुळे या बैठकीसाठी मंत्री जानकर, या खात्याचे सचिव आबासाहेब ज-हाड व दुग्धव्यवसाय विकास आयुक्त राजेंद्र जाधव उपस्थित होते. याशिवाय गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार आशिष शेलार, आमदार पराग अळवणी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. 

जानकर यांनी बैठकीतून निरोप घेतल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अन्य मंत्री व अधिका-यांसोबत बैठक पार पाडली. विशेष म्हणजे, रवींद्र वायकर हे स्वतः शिवसेनेचे मंत्री असून अर्जुन खोतकर हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. वायकर यांनी खोतकर कन्येच्या साखरपुड्यापेक्षा जनहिताच्या कामाला अधिक महत्त्व देत बैठक पूर्ण केली. महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार आशिष शेलार, पराग अळवणी यांनीही बैठकीला महत्त्व दिले. पण एकट्या जानकर यांनाच साखरपुडा का महत्त्वाचा वाटला, अशी या बैठकीनंतर दबक्‍या आवाजात चर्चा सुरू होती. 

संबंधित लेख