`महादेव जानकर बारामतीतूनच लढणार; तयारीला लागा`

महादेव जानकर यांना २०१४ प्रमाणे लोकसभेची निवडणूक सोपी वाटते आहे का?
`महादेव जानकर बारामतीतूनच लढणार; तयारीला लागा`

वालचंदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे लोकसभेची निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढविणार असल्याने रासपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासून निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन रासपच्या प्रदेश सचिव डॉ. अर्चना पाटील यांनी केले.

इंदापूर तालुक्यामध्ये रासपच्या पदाधिकाऱ्यांचे दौऱ्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. लाखेवाडी(ता.इंदापूर) येथे नुकतीच बूथप्रमुखा,कार्यकत्यांची बैठक पार पडली. त्या वेळी पाटील बोलत होत्या.

यावेळी त्यांनी सांगितले की, लोकसभेच्या निवडणुकीला कमी कालावधी राहिला आहे. रासपचे संस्थापक महादेव जानकर लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील बूथ यंत्रणा मजबूत करण्यावरती भर द्यावा. एक बूथ दहा यूथ ही संकल्पना राबवावी. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचून जास्तीजास्त कामे करण्याचा प्रयत्न करावा. विजयी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जनसंपर्क सुरू करावा.

यावेळी बूथ कमिटीच्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी त्यांना पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश प्रवक्ते विष्णू चव्हाण, बारामती लोकसभेचे प्रभारी बापूराव सोलनकर, जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे, युवा नेते जनार्धन पांढरमिसे, तालुका उपाध्यक्ष सतीश तरंगे, गणेश हेगडकर, भाजप चे जाबवंत ढोले, वैजनाथ हंगे, दयानंद हेगडकर, आबासाहेब वाघमोडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com