magund books village when ? vinod tawade | Sarkarnama

पुस्तकांचे गाव मालगुंडला कधी ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई : भिलारपाठोपाठ दुसरे पुस्तकांचे गाव रत्नागिरीत मालगुंड गावात उभारण्यात येईल, अशी घोषणा मराठीभाषा मंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्याला 16 महिने उलटून गेल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने कोकण मराठी साहित्य परिषदेने तावडे यांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. 

मुंबई : भिलारपाठोपाठ दुसरे पुस्तकांचे गाव रत्नागिरीत मालगुंड गावात उभारण्यात येईल, अशी घोषणा मराठीभाषा मंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्याला 16 महिने उलटून गेल्यानंतरही कार्यवाही न झाल्याने कोकण मराठी साहित्य परिषदेने तावडे यांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. 

पुस्तकाच्या गावासाठी भिलार व मालगुंड या दोन गावांची निवड करण्यात आली. त्याप्रमाणे मालगुंडसाठी कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुस्कर यांना 2015 मध्ये मराठी भाषा विभागाने विचारणा केली होती. त्याला केळुस्कर यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर मराठी विभागाचे प्रधान सचिव यांनी मालगुंड येथील पुस्तकाच्या गावासाठी केळुसकर यांना आराखडा बनवण्यास सांगितला.तो केळुसकर यांनी 2015 मध्येच सादर केला; मात्र 4 मे 2017 रोजी भिलार येथे पुस्तकाच्या गावाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

त्यावेळी केळुसकर उद्‌घाटन कार्यक्रमाला गेले होते. 2018 मध्ये मालगुंड येथे पुस्तकाच्या गावाचे उद्‌घाटन करण्यात येईल, असे तोंडी आश्‍वासन त्यांना तावडे यांनी दिले होते. प्रत्यक्षात मालगुंडसाठी काहीच प्रतिसाद मराठीभाषा विभागाकडून मिळाला नाही. म्हणून आम्ही तावडे यांना स्पीड पोस्टद्वारे विचारणा केल्याची माहिती केळुसकर यांनी दिली. 

मालगुंड येथे कवी केशवसुत यांचे स्मारक आहे. मालगुंड गणपतीपुळेजवळ असल्याने लाखो पर्यटक येथे येतात. स्मारकाला सुमारे 50 हजार पर्यटक भेट देतात. भिलारपेक्षा जास्त पर्यटक येथे येत असतानाही प्रस्ताव बाजूला का सारला गेला, असा सवाल पत्रात केला आहे. 2018 डिसेंबरपर्यंत मालगुंड पुस्तकाचे गाव होणार का? सरकारचा निर्णय नक्की काय? अशी विचारणाही कोकण मराठी साहित्य परिषदेने पत्रात केली आहे. 

पुस्तकाच्या गावाचा पहिला प्रस्ताव मालगुंडचा होता. तसा पत्रव्यवहारही मराठीभाषा विभागाने कोमसापशी केला होता; तरी मालगुंडचा प्रस्ताव बाजूला सारण्यात आला. यावर्षी तरी मालगुंड पुस्तकांचे गाव म्हणून सरकारने जाहीर करावे. 
महेश केळुसकर, केंद्रीय अध्यक्ष, कोमसाप 

संबंधित लेख