मध्यप्रदेशात काँग्रेसची आघाडी, राजस्थानात बहुमत

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी दहा वाजेपर्यंत काँग्रेस 116 जागांवर आणि भाजप 99 जागांवर आघाडीवर होती.
मध्यप्रदेशात काँग्रेसची आघाडी, राजस्थानात बहुमत

भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आव्हान देत मैदानात उतरलेल्या काँग्रेसने मध्य प्रदेशात जोरदार टक्कर दिली असून, सकाळी दहा वाजेपर्यंत काँग्रेस 116 जागांवर आणि भाजप 99 जागांवर आघाडीवर होती. राजस्थानातही काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. राजस्थानात काँग्रेसची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.

मध्य प्रदेश विधानसभेसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून, आज निकाल जाहीर होत आहेत. या राज्यात चौहान यांच्या नेतृत्वाखाली गेली 15 वर्षे भाजपचे सरकार सत्तेवर आहे. 230 सदस्यांच्या या विधानसभेत बहुमतासाठी 116 जागा आवश्‍यक आहेत. राजस्थानात काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठला आहे. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत भाजप 81 काँग्रेस 101 जागांवर आघाडीवर होती. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप-कॉंग्रेस यांच्यात काट्याची लढत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार निकालात पाहायला मिळत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com