madhya pradesh exit poll bjp and cong neck to neck fight | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मध्य प्रदेशमध्ये भाजप, की कॉंग्रेस? काय सांगताहेत एक्झिट पोल? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये सत्तेसाठी काट्याची टक्कर असल्याची स्थिती विविध `एक्झिट पोल'मधून स्पष्ट झाली आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या 11 डिसेंबर रोजी होणार आहे.

पुणे : मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये सत्तेसाठी काट्याची टक्कर असल्याची स्थिती विविध `एक्झिट पोल'मधून स्पष्ट झाली आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या 11 डिसेंबर रोजी होणार आहे.

टाईम्स नाऊ - सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 126, कॉंग्रेसला 89, तर बसपला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागणार आहे. इतरांना नऊ जागांवर यश मिळेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अॅक्सिस माय इंडिया-इंडिया टुडे आणि आज तकच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 102 ते 120, कॉंग्रेसला 104 ते 122, तर बसपला एक ते तीन जागा मिळतील. इतरांना तीन ते आठ जागांवर यश मिळाले.

`जन की बात'च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 108 ते 128, कॉंग्रेसला 98 ते 115 जागांवर यश मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. इतरांना 07 जागा मिळतील, असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. 

मध्य प्रदेशच्या सत्तेवर 2005 पासून भाजपचे शिवराजसिंह चौहान आहेत. त्यामुळे यंदा `अॅण्टिइन्कंम्बन्सी'चा फटका बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 230 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीसाठी भाजपने 230, कॉंग्रेसने 229 जागा लढवल्या होत्या. टिकमगढ जिल्ह्यातील जटारा मतदारसंघ कॉंग्रेसने शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दलाला सोडलेली आहे.  

गेल्या निवडणुकीत भाजपला 165, कॉंग्रेसला 58 जागा मिळाल्या होत्या. एक्झिट पोलमधील आकडेवाडीनुसार या निवडणुकीत कॉंग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहेत.

संबंधित लेख