madhusudan kendre failer mla ratnakar gutte said | Sarkarnama

डॉ. मधुसुदन केंद्रे हे निष्क्रिय आमदार, डॉ. रत्नाकर गुट्टेंचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

परभणी : गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे हे निष्क्रीय आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या मतदार संघात किती विकास कामे केले हे सांगावे असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले. त्यांनी केलेली विकास कामे दाखवावे व माझ्याकडून 1001 रुपयाचे बक्षीस घ्यावे असे ही ते म्हणाले. 

परभणी : गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे हे निष्क्रीय आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या मतदार संघात किती विकास कामे केले हे सांगावे असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले. त्यांनी केलेली विकास कामे दाखवावे व माझ्याकडून 1001 रुपयाचे बक्षीस घ्यावे असे ही ते म्हणाले. 

डॉ. केंद्रे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी गुट्टे यांनी बुधवारी (25) परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आमदार केंद्रे यांनी केलेल्या आरोपांचे खंडण तर केलेच, परंतू त्यांनी केंद्रे यांनी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत अनामत रक्कम वाचवून दाखवावी असे खुले आव्हानही दिले. गंगाखेड शुगरच्या माध्यमातून गुट्टे यांनी बॅंकाना फसवून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलली आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर गुट्टे यांनी कर्ज उचलली आहेत. ती अद्यापही फेडलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नोटीसा आल्या आहेत असे गंभीर आरोप डॉ. केंद्रे यांनी केले होते. 

त्या आरोपाला उत्तर देताना बुधवारी गुट्टे यांनी या आरोपांचे खंडण करतांना सांगितले की, जे कर्ज माझ्याकडे नाहीतच ते मी कसे स्विकारू. केंद्रे हे एकच आरोप वारंवार करत आहेत. ते प्रकरण सध्या न्यायालयात प्रविष्ठ आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय येई पर्यत त्यांनी धिर धरावा. 

गुट्टे आमदार केंद्रेना सल्ले देण्यास ही विसरले नाहीत. कामे करा, एकाच मुद्यावर किती बोलाल, जो न्यायालयात प्रविष्ठ मुद्दा आहे त्यासाठी न्यायालयावर विश्वास ठेवा, चांगला सी. ए . ठेवून अभ्यासपूर्ण बोला असे सल्ले देण्यास ते विसरले नाहीत. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, माजी नगरसेवक नंदकुमार पटेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, गंगाखेड पंचायत समितीचे सभापती मगर पोले, नगरसेवक राजू पटेल, सत्यपाल साळवे आदी उपस्थित होते.  

 

 

 

संबंधित लेख