आजचा वाढदिवस : आमदार माधुरी मिसाळ, आमदार भाजप 

आजचा वाढदिवस : आमदार माधुरी मिसाळ, आमदार भाजप 

पर्वती विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार माधुरी मिसाळ यांचे मतदारसंघातील काम आणि संघटन वाखाणण्याजागे आहे. राज्य विधी मंडळाच्या लोकलेखा समितीच्या सदस्य म्हणून त्या काम करीत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक त्यांच्या पर्वती मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. आमदारकीच्या आधी पुणे महापालिकेत 2007 मध्ये नगरसेविका म्हणून त्या प्रथम निवडून आल्या होत्या. विद्या सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्ष होत्या, आता उद्यम विकास बॅंकेच्या त्या विद्यमान संचालक आहेत. शिक्षण प्रसारक मंडळी या पुण्यातील प्रमुख शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळावर संचालक म्हणूनही त्या काम करीत आहेत. राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले होते. मात्र राजकीय तडजोड म्हणून त्यांच्याऐवजी अन्य महिला आमदारांना संधी देण्यात आली. दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मिसाळ यांची पर्वती मतदारसंघावर मजबूत पकड आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com